एस.टी. वाहतूक नियंत्रक कक्षाला ठोकले कुलूप

By Admin | Updated: April 2, 2015 02:03 IST2015-04-02T02:03:04+5:302015-04-02T02:03:04+5:30

रिसोड नगर परिषदेची कारवाई; थकीत करापोटी पार्सल कक्ष केले सीलबंद.

S.T. Lock locks in the traffic control room | एस.टी. वाहतूक नियंत्रक कक्षाला ठोकले कुलूप

एस.टी. वाहतूक नियंत्रक कक्षाला ठोकले कुलूप

रिसोड (जि. वाशिम) : नगर परिषदेची कर वसुलीसंदर्भात धडक मोहीम शहरात सुरू असून, शासकीय कार्यालय पाठोपाठ आता एस.टी. महामंडळावर कारवाई करून कार्यालयावर जप्तीच्या नोटीससह सीलबंद करण्यात आले आल्याची घटना १ एप्रिल रोजी दुपारी ५ वाजताच्या दरम्यान घडली . नगर परिषदेचा २ लाख ८३ हजार २६६ रु. करारासाठी वसुली अधिकार्‍यांनी एस. टी. बसस्थानकमधील वाहतूक नियंत्रण कक्ष व पार्सल कक्षाला कुलूप ठोकण्यात आले . तसेच कार्यालयावर जप्तीची नोटीस लावण्यात आली आहे. यापूर्वी पं.स.मधील गटविकास अधिकारी कक्षाला कुलूप लावण्यात आले होते. तद्नंतर आता एस.टी. महामंडळावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. कार्यालयांनी थकीत कर भरण्याचे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.

Web Title: S.T. Lock locks in the traffic control room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.