शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लोणारच्या पर्यटन विकासात एसटी महामंडळाचा खोडा; शहरात आगारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 14:22 IST

लोणार येथे एसटीचे आगारच नसल्याने मेहकर येथून लोणारसाठी बसगाड्या सोडण्यात येता. त्याचा फटका देशी, विदेशी पर्यटकांना बसत आहे.

ठळक मुद्देपर्यटकांना घ्यावा लागत आहे खासगी वाहनाचा आसरा

लोणार : जागतिक  आश्चर्य असलेल्या लोणार सरोवर परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने चांगला उपयोग होऊ शकतो. त्यानुषंगाने नागरिक, पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देण्यासाठी येतात. मात्र लोणार येथे एसटीचे आगारच नसल्याने मेहकर येथून लोणारसाठी बसगाड्या सोडण्यात येता. त्याचा फटका देशी, विदेशी पर्यटकांना बसत आहे.

नाही म्हणायला येथे बसस्थानक आहे. पण त्याचे नियंत्रण हे मेहकर येथून होते. ऐतिहासिक, धार्मिक, वैज्ञानिक, पुरातत्वीय संदर्भाने लोणारचे महत्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे येथे देश, विदेशातून पर्यटक वैज्ञानिक येतात. परंतू प्रवासाच्या योग्य सुविधा नसल्याने अडचणी आहेत. त्यामुळे जादा खर्च करून खासगी वाहनाचा आसरा पर्यटकांना घ्यावा लागत आहे.येथील महत्त्व पाहता येथे लांब पल्ल्याच्या बसगाड्या सोडण्यात येऊन प्रवाशी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी प्रवाशी सेवा संघाने वारंवार मागणी केली आहे. काही बसफेर्याही सुरू झाल्या त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. मात्र लांब पल्ल्याच्या बसगाड्या बंद करण्यात आल्याने पुन्हा परिस्थिती जैसे थे आहे. खासगी वाहतुकीस प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कथितस्तरावर हे प्रयत्न झाल्याची ओरड सध्या येथे होत आहे. प्रकरणी १४ नोव्हेंबरला राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयास लोणारसाठी लांब पल्ल्याच्या बसगाड्या सुरू करण्याची मागणी लोणार प्रवासी सेवा संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

पर्यटन वाढीस अडचणबुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, जळगाव जामोद, चिखली, आणि मलकापूर या चार आगारापैकी एकाही आगारीच बसफेरी ही लोणारसाठी सुटत नाही. त्यामुळे पर्यटकांना अडचण येते तर खासगी अवैध प्रवाशी वाहतुकीचे फावते. त्यामुळे येथून बसफेर्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी आहे. या  बसफेरी सुरू होण्याची गरजपर्यटन वाढीसाठी लोणारला भंडारा, जळगाव, नांदेड, अमरावती, बीड विभागातून बसफेर्या सुरू करण्याची गरज आहे. भंडारा जिल्हयातील पवनी ते लोणार ही बसफेरी सुरू करण्याची गरज आहे. सोबतच औरंगाबाद येथून सकाळी सव्वा आठ वाजता सोडण्यात येणारी बसफेरी सकाळी सव्वा सात वाजता सोडण्यात यावी, अशी मागणी आहे. लोणार-बीड ही  गेल्या नऊ वर्षापासून सुरू असलेली बस नियमित स्वरुपात सुरू आहे. मात्र ती थेट अक्कलकोटपर्यंत पाठविण्यात यावी, अशी प्रवाशी, भाविक व नागरिकांची मागणी आहे. लोणार येथून सकाळी आठ वाजता ही बस निघाल्यास बीड, मांजरसुंबा, येरमाळा, येडशी, उस्मानाबाद, तुळजापूर आणि सोलापूर मार्गे अक्कल कोट येथे पोहोचू शकले. तेथून सकाळी साडेपाच वाजता ती लोणारसाठी सुटावी, अशी मागणी आहे.जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांना प्रवाशी सुविधा मिळाल्यास पर्यटकांची संख्या वाढून शहरातील पर्यटन व्यवसाय वाढेल. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होईल. - भागवत खरात, सचिव, प्रवाशी सेवा संघटना, लोणार.

टॅग्स :lonar ves mehekarलोणार वेस मेहकर