शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार तुषार संच ! २९ जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 16:20 IST

केंद्रवर्ती अर्थसंकल्प सन २०१८-१९ मध्ये न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत वनहक्क कायद्यांतर्गत जमीन प्राप्त झालेल्या आदिवासी लाभार्थ्यांना व सर्वसाधारण आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर तुषार संच पुरवठा करण्याची योजना मंजूर झाली आहे.

वाशिम - केंद्रवर्ती अर्थसंकल्प सन २०१८-१९ मध्ये न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत वनहक्क कायद्यांतर्गत जमीन प्राप्त झालेल्या आदिवासी लाभार्थ्यांना व सर्वसाधारण आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर तुषार संच पुरवठा करण्याची योजना मंजूर झाली आहे. अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील आदिवासी लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अनुसूचित जमातीमधील इच्छुक शेतकरी लाभार्थ्यांनी १५ ते २९ जून २०१९ या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकाºयांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.या योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित लाभार्थींना काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा शेतकरी असावा. त्याच्याकडे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अपंग, विधवा, परित्यक्ता लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थ्याकडे दारिद्र्यरेषेचे कार्ड किंवा राशन कार्ड असणे आवश्यक आहे. अर्जासोबत रहिवाशी दाखला, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, जमीन धारणेचा सातबारा दाखला, आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. वैयक्तिक वनहक्क पट्टेधारक लाभार्थींना (आयएफआर होल्डर) प्राधान्य देण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विभागाकडून न मिळाल्याबाबतचे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. पाण्याचे स्त्रोत विहीर, नाला, नदी असणे आवश्यक आहे. पाणी उपशाची साधने तेलपंप, वीजपंप असणे आवश्यक आहे. अर्जाचा विहित नमुना अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहे. पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी १५ जून ते २९ जून २०१९ या कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकाºयांनी केले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी