मंगरूळपीर येथे चिडीमारीला उधाण

By Admin | Updated: August 1, 2014 02:19 IST2014-08-01T02:13:34+5:302014-08-01T02:19:16+5:30

छेडखानी प्रतिबंधक पथक कार्यरत कराण्याची युवा सेनेची मागणी.

Sprinkle a birdie at Mangurpur | मंगरूळपीर येथे चिडीमारीला उधाण

मंगरूळपीर येथे चिडीमारीला उधाण

मंगरूळपीर : ग्रामीण तथा शहरातून महाविद्यालयात ये-जा करणार्‍या विद्यार्थिनींना चिडीमारांपासून प्रचंड त्रास होत असल्यामुळे पोलिसांनी चिडीमार पथक तयार करून कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेच्यावतीने ३१ जुलै रोजी मंगरूळपीर ठाणेदाराकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरासह ग्रामीण भागातून महाविद्यालयात ये-जा करणार्‍या विद्यार्थिनींना रस्त्यावर चिडीमार करणारे रोडरोमिओपासून मोठय़ा प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शाळा-कॉलेज सुटल्यावर भर रस्त्यावर मोटारसायकलीच्या स्पर्धा लावून भरधाव गाड्या चालवितात. यांचा बदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी चिडीमार पथक तयार करून कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेचे तालुका प्रमुख सुरज बुरे, उपप्रमुख जुबेर मोहनावाले, शहरप्रमुख समीप हवा पाटील तसेच नितीन विटकरे, शेखर खडसे, नीलेश राऊत, मोहन येवले, युवराज गहुले, प्रशांत गावंडे, जलील मोहनावाले, दादाराव अव्हाळे, शुभम नैताम, सुरेश लहाने, मोतीराम गोटे, रामदास कदम यांनी केली आहे. महाविद्यालयीन युवतींमध्ये भीतीचे वातावरण * मंगरूळपीर तालुक्यातील बहुसंख्य महाविद्यालयीन युवती शहरात येतात. चिडीमारीच्या घटना घडत असल्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Sprinkle a birdie at Mangurpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.