सैनिक शाळेचे खेळाडू विभागावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:51 IST2017-09-14T19:51:37+5:302017-09-14T19:51:55+5:30
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धा तिन गटामध्ये पार पडल्या. स्थानिक यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेचे स्केटींग खेळाडूंनी विविध गटामध्ये स्केटींगचे उत्कृष्ट कौशल्य दाखवुन प्रथम क्रमांक पटकावला व विभागस्तरावर खेळण्यास पात्र ठरले.

सैनिक शाळेचे खेळाडू विभागावर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धा तिन गटामध्ये पार पडल्या. स्थानिक यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेचे स्केटींग खेळाडूंनी विविध गटामध्ये स्केटींगचे उत्कृष्ट कौशल्य दाखवुन प्रथम क्रमांक पटकावला व विभागस्तरावर खेळण्यास पात्र ठरले.
१७ वर्षीय खेळाडूमध्ये कुमार स्वरुप, बोरकर, सहयोग पवार,आशिष राठोड तर १४ वर्षीय स्कॉड टाईप स्केटींग स्पर्धेमध्ये वेदांत ढवळे, क्रिश बागडी, कृ ष्णा कव्हर, अभिषेक बाजड आणि इनलाईन स्केटींग कुमार विघ्नेश दंडे या खेळाडूंचा समावेश होता. यशस्वी सर्व खेळाडू विभागस्तरावर वाशिम जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. सदर यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे सचिव दादासाहेब ठाक रे, प्राचार्य एम.एस.भोयर, कर्नल पी.पी.ठाकरे, वाय.आर.शर्मा यांनी पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्यात. यशस्वी खेळाडु आपल्या यशाचे श्रेय ए.के.चांदणे, तथा एस.बी.कºहाडे यांना देतात.