मालेगाव नगर पंचायत निर्मितीच्या हालचालींना वेग
By Admin | Updated: February 12, 2015 00:51 IST2015-02-12T00:51:36+5:302015-02-12T00:51:36+5:30
कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम होऊ शकतो जाहीर.

मालेगाव नगर पंचायत निर्मितीच्या हालचालींना वेग
मालेगाव (वाशिम) : ग्रां.प. मालेगावला नगर पंचायतचा दर्जा देऊन त्या ठिकाणी नगर पंचायत निर्मितीच्या हालचालींना आता वेग आला असून, नगर पंचायत निर्मितीची घोषणा यापूर्वीचे केली होती; मात्र त्यानंतर नवीन सरकार आले व ही प्रक्रिया रेंगाळली होती; मात्र आता या प्रक्रियेला चांगलाच वेग आला असून, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व नगररचना विभागाने यासाठी इत्यंभूत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागविली आहे. याबाबत अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांचे पत्र झेड. पी.बी. २0१४/ प्र.क.७८/ पंरा.५ ग्रामविकास व जलसंधारण विभाग १४ जानेवारी २0१५ च्या परिपत्रकानुसार या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांना नोटिसा पाठविण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. क कक्ष १२ /क.ल./न.पा.प्र./ कावि/३३/ २0१५ नुसार मालेगाव हद्दीतील जिल्हा परिषद सदस्य चंदू उत्तम जाधव, पंचायत समिती सदस्य बबन नामदेव चोपडे, पंचायत समिती सदस्य सुमनबाई भीमराव गुडदे यांना ३१ जानेवारीला या बाबत म्हणणे मांडण्यासाठीसुद्धा बोलावले होते. विशेष म्हणजे ज्या दिवशी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर पत्रात असे नमूद करण्यात आले की, शासनाकडून आलेल्या पत्रानुसार वाशिम जिल्हय़ातील मालेगाव या तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देण्याबाबत धोरण निश्चित केले असून, त्यानुसार मालेगाव ग्रा.प.ला नगर पंचायत दर्जा देताना जिल्हा परिषद मालेगाव गटाचे सर्व क्षेत्र प्रस्तावित नगर पंचायतीत समाविष्ट होत आहे. पंचायत समिती ५७ मालेगाव व ५८ मालेगाव मतदार गणाचे क्षेत्र मालेगाव नगर पंचायतीत समाविष्ट होत असल्याने त्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार्या संबंधित सदस्यांचे सदस्यत्व महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ चे कलम २५५ व २५७ अन्वये रद्द होणार आहे. या संबंधित अहवाल अवर सचिव ग्रामविकास व जलसंधारण विभाग, बांधकाम भवन २५, आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन अमरावती, तहसीलदार मालेगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत. मालेगाव ग्रा.पं.ची प्रभाग रचना तयार झाली असून, दुसरीकडे अचानक नगर पंचायत निर्मिती अंतिम टप्प्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.