सट्टाबाजाराचे भाकित ठरले तंतोतंत खरे !
By Admin | Updated: October 20, 2014 23:27 IST2014-10-20T23:27:01+5:302014-10-20T23:27:01+5:30
वाशिम जिल्ह्यातील निवडणुकीचे अनुमान खरे, सट्टाबाजारात दोन जागा भाजप तर एक काँग्रेस.

सट्टाबाजाराचे भाकित ठरले तंतोतंत खरे !
वाशिम: जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातील आमदार निवडीबाबत जनमत काय असेल याचा मागमोस घेणारा सट्टाबाजार यावेळच्या विधानसभा निवडूकीच्या निकालाबाबत भाकित करण्यात तंतोतंत खरा ठरला आहे.
प्रचंड चर्वितचर्वनानंतर राज्यातील भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची युती व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्याने नेमकी काय स्थिती निर्माण होईल याबाबत सर्वच माध्यमांकडून अंदाज वर्तविल्या जात होते. ऐन निवडणूकिच्या तोंडावर तुटलेल्या युती आघाडीमुळे वाशिम जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व रिसोड या तिनही विधानसभा म तदारसंघातही चांगल्याच राजकीय उलथापालथी झाल्या. काही जिल्हा परिषद सदस्यांनी इतर पक्षाची उमेदवारी घेवून निवडणूकिच्या रिंगणात उडी घेतली. तर काही पक्ष पदाधिकार्यांनी ज्या पक्षाचे काम केले त्यांना त्या पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी दूसर्या पक्षाकडून उमेदवारी मिळवत निवडणूकिच्या रिंगणात दंड थोपटले होते. आजी माजी आमदारांची निवडणूकिच्या रिंगणातील हजेरी व काही प्रस्थापित राजकीय दिग्गज यामुळे निवडणूकिच्या रिगणात कोण विजयी होईल याबाबत तर्कवितर्कांना उधान आले होते. परंतू या उधानादरम्यान नेहमीच आपल्या अंदाजाने सर्वांना चकीत करणार्या सट्टाबाजाराने यावेळीही तंतोतंत अंदाज व्यक्त करत वाशिम जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघापैकी दोन म तदारसंघात भाजपाचे कमळ फुलणार तर एक मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राहिल असा अंदाज व्यक्त केला होता.