आरोग्य विभागाचे विशेष पथक अनसिंगमध्ये दाखल!
By Admin | Updated: April 27, 2017 19:41 IST2017-04-27T19:41:42+5:302017-04-27T19:41:42+5:30
अनसिंग- "स्वाईन फ्लू’मुळे युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघड होताच, २७ एप्रिल रोजी सकाळी आरोग्य विभागाचे विशेष पथक गावात दाखल झाले.

आरोग्य विभागाचे विशेष पथक अनसिंगमध्ये दाखल!
अनसिंग : गावात "स्वाईन फ्लू’मुळे २६ एप्रिल रोजी एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघड होताच सर्वत्र खळबळ माजली असून गुरूवार, २७ एप्रिल रोजी सकाळी आरोग्य विभागाचे विशेष पथक गावात दाखल झाले. त्यात सहभागी डॉक्टरांनी गावातील संशयित रुग्णांची तपासणी केली. सोबतच नाल्यांमध्ये औषध फवारणी देखील करण्यात आली.
"स्वाईन फ्लू’गावात पसरत असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे बाह्यसंपर्क अधिकारी डॉ.धोतरे, डॉ.डावरे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजाता मुंडे, ग्रामीण रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी रमेश वाघ आदिंनी गावात येउन सरपंच सिंधू विठ्ठल सातव, सचिव एम.पी.बोडखे, उपसरपंच शे.गफारभाई यांच्यासोबत चर्चा केली. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या सर्व नाल्यांमध्ये प्रतिबंधात्मक औषधाची फवारणी करुन ह्यस्वाईन प्लूह्णवर सर्वांगाने नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.