मातीच्या पणत्याची ह्यटेराकोटाह्णने घेतली जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 13:23 IST2017-10-17T13:23:19+5:302017-10-17T13:23:40+5:30
दीपावली दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जातो. जास्तीत जास्त दिवे लावून परिसर प्रकाशमय केल्या जातो. यासाठी पणत्या लागतात. पारंपारिक पध्दतीने वापरात असलेल्या पणत्यांची आकर्षक दिसणाºया टेराकोटाने जागा घेतली असल्याचे बाजारात विक्रीस आलेल्या टेराकोटाच्या पणत्यावरुन दिसून येते.

मातीच्या पणत्याची ह्यटेराकोटाह्णने घेतली जागा
ठळक मुद्देमातीच्या पणत्यांची संख्या घटली : ग्राहकांची पसंती
वाशिम: दीपावली दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जातो. जास्तीत जास्त दिवे लावून परिसर प्रकाशमय केल्या जातो. यासाठी पणत्या लागतात. पारंपारिक पध्दतीने वापरात असलेल्या पणत्यांची आकर्षक दिसणाºया टेराकोटाने जागा घेतली असल्याचे बाजारात विक्रीस आलेल्या टेराकोटाच्या पणत्यावरुन दिसून येते.
टेराकोटाच्या पणत्या दिसण्यास आकर्षक दिसून येत असल्याने कुंभारांनी बनविलेल्या पणत्या विक्रीवर परिणाम झालेला दिसून येत आहे. आकर्षक दिसून येत असलेल्या टेराकोटाच्या पणत्यांकडे ग्राहक आकर्षित होत असून प्रथम पसंती देतांना दिसून येत आहेत. यामुळे मातीच्या पणत्यांच्या विक्रीत घट दिसून येत आहे.