सोयाबीनने गाठला साडेपाच हजारांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST2021-03-19T04:41:20+5:302021-03-19T04:41:20+5:30

गतवर्षी जिल्ह्यात सोयाबीन काढणीवर असतानाच अवकाळी पावसाचा या पिकाला फटका बसल्याने हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनातही घट आली. ...

Soybeans reached the stage of five and a half thousand | सोयाबीनने गाठला साडेपाच हजारांचा टप्पा

सोयाबीनने गाठला साडेपाच हजारांचा टप्पा

गतवर्षी जिल्ह्यात सोयाबीन काढणीवर असतानाच अवकाळी पावसाचा या पिकाला फटका बसल्याने हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनातही घट आली. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. त्यात सुरुवातीच्या काळात बाजार समित्यांत अल्पदराने सोयाबीनची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले. दरम्यान, ब्राझील, अमेरिकेसारख्या सोयाबीन उत्पादक देशातही या शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. त्यामुळे सोयाबीनच्या मागणीत आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ झाली. चीनकडूनही सोयाबीनची मागणी होत असल्याने देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी येऊ लागली. याचा परिणाम विदर्भातील बाजारात दिसून येऊ लागला. त्यात वाशिम जिल्ह्यातील बाजारातही सोयाबीनच्या दराने उच्चांक गाठला असून, बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ५०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत.

------------

मंगरुळपीर बाजार समितीत सर्वाधिक दर

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर बाजार समितीत सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपयांहून अधिक झाले आहेत. गुरुवारी बाजार समितीकडून प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी कमाल ५,५४० रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी झाली. जिल्ह्यातील इतरही बाजार समित्यांत सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच होते.

--------------

बाजार समित्यांमधील सोयाबीनचे दर

वाशिम ५,४९१

मं.पीर ५,५४०

मानोरा ५,४००

रिसोड ५,४३९

मालेगाव ५,४३०

------------------------

Web Title: Soybeans reached the stage of five and a half thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.