सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजारावर; पण शेतकऱ्यांना फायदा काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 05:52 PM2021-07-26T17:52:54+5:302021-07-26T17:53:37+5:30

Agriculture News : सोमवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजारांवर दर मिळाले.

Soybean rate nine thousand per quintal in washim | सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजारावर; पण शेतकऱ्यांना फायदा काय?

सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजारावर; पण शेतकऱ्यांना फायदा काय?

googlenewsNext

वाशिम : जवळपास ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन संपले आहे. बाजार समित्यांमधील आवकही घटली आहे. अशा परिस्थितीत आता सोयाबीनला झळाळी मिळत असून, सोमवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजारांवर दर मिळाले. या वाढीव दराचा फायदा काय? अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत.
शेतकºयांना दरवर्षीच विविध संकटातून जावे लागते. शेतमाल घरी आल्यानंतर विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतमाल विक्री करावा लागतो. अल्प भूधारक शेतकरी तर शेतमाल तयार झाला की बाजार समितीत विक्रीसाठी आणतो. मध्यम व श्रीमंत वर्गातील काही शेतकरी भाववाढ होईल या अपेक्षेने पाच ते सहा महिने सोयाबीनची विक्री थांबवू शकतात. ऐन हंगामात सोयाबीनला २६०० ते ३६०० या दरम्यान प्रती क्विंटल दर असतात. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बहुतांश शेतकºयांना अल्पदरात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. सोयाबीनचा हंगाम संपल्यानंतर ७ ते ८ महिन्याने बाजारभाव वाढतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकºयांना येतो. यंदाही जून महिन्यापासून सोयाबीनचे दर विक्रम प्रस्थापित करीत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवार, २६ जुलै रोजी सोयाबीनचे दर प्रति क्विंटल नऊ हजारांवर पोहचले. मात्र, ९५ टक्के शेतकºयांच्या घरात सध्या सोयाबीन नसल्याने या वाढीव दराचा शेतकºयांना फारसा लाभ होणार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत.
 
शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना फायदा !
 
सोयाबीनच्या ऐन हंगामात बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्यांना येतो. दर वाढले असले तरी सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन नाही. त्यामुळे या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होईल.
- पांडुरंग सोळंके
प्रगतशील शेतकरी
 
सोयाबीनचे दर आता नऊ हजारावर गेले आहेत. परंतू, याचा फायदा अल्पभूधारक व मध्यमवर्गीय शेतकºयांना काहीच नाही. सोयाबीनचा शेतमाल तयार झाल्यानंतर प्रती क्विंटल सहा ते आठ हजारादरम्यान दर असणे शेतकºयांना अपेक्षीत आहे.
- संजयकुमार सरनाईक
प्रगतशील शेतकरी
 
सोयाबीन घरात झाल्यानंतर शेतमालाच्या दरात तेजी येत आली तर याचा सर्वाधिक लाभ शेतकºयांना होईल. मात्र, ऐन हंगामातच सोयाबीनला तीन ते साडेतीन हजारादरम्यान दर मिळतात. गरज म्हणून अनेक शेतकºयांना अल्पभावात सोयाबीन विकावी लागते.
- रमेश अवचार,
प्रगतशील शेतकरी

Web Title: Soybean rate nine thousand per quintal in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.