मंगरुळपीरात सोयाबीनचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:45 AM2021-09-27T04:45:57+5:302021-09-27T04:45:57+5:30

मंगरुळपीर : सतत अस्मानी, सुल्तानी संकटांशी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी यंदाही अतिपावसाने मोठे संकट उभे केले आहे. अशात सोयाबीनचे भावही ...

Soybean prices plummeted in Mangrulpeer | मंगरुळपीरात सोयाबीनचे भाव गडगडले

मंगरुळपीरात सोयाबीनचे भाव गडगडले

Next

मंगरुळपीर : सतत अस्मानी, सुल्तानी संकटांशी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी यंदाही अतिपावसाने मोठे संकट उभे केले आहे. अशात सोयाबीनचे भावही मोठ्या प्रमाणात गडगडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी सोयाबीनचे प्रतिक्विंटल दर १० हजारांपर्यंत पोहोचले होते. मात्र, आता नवीन माल बाजारात दाखल होताच ते पाच हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. केंद्र सरकारने १२ लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात करण्याची परवानगी दर्शविल्याचाही परिणाम दर कमी होण्यावर झाल्याचे बोलण्यात येत आहे. भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, जर परिस्थिती अशीच कायम राहिली तर यावर्षी सोयाबीन तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकावे लागेल. दुसरीकडे सततच्या पावसाने शेतकऱ्यांची झोप उडाली असून काढणीला सोयाबीन आलेले असताना पिकाची नासाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही ठिकाणी तर सोयाबीनला कोंब फुटत आहेत. त्यामुळे एकीकडे पावसामुळे होणारे नुकसान व दुसरीकडे भाव कमी झाल्याने होणारे नुकसान असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

................

सोयाबीनचा एकरी लागवड खर्च

नांगरणी १२००

वखरपाळी ५००

बियाणे २५००

खत १०५०

पेरणी ७००

तणनाशक ५००

डवरपाळी ५००

खुरपणी ७५०

कीटकनाशक ४०००

फवारणी खर्च ७५०

सोंगणी खर्च ३०००

कापड (पटी) ५००

सोयाबीन काढणी ९००

खाली पोते ३००

ट्राॅली भाडे ५००

हमाली १८०

............................

१७,३३०

प्रतिएकर एकूण खर्च

४ क्विंटल

एकरी उत्पादन

६३००

सोयाबीनचा सध्याचा दर

२५,२००

हाती पडणारा एकूण मोबदला

७८७०

प्रतिएकर मिळणारा नफा

Web Title: Soybean prices plummeted in Mangrulpeer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.