शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

सोयाबीनची आवक वाढली; वाढत्या दराचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 4:26 PM

वाशिम: सोयाबीनचे दर दिवसेंदिवस वाढतच असून, सोमवारी बाजार समित्यांत व्यापाºयांकडून सोयाबीनला ३६०० रुपयांहून अधिक दर शेतकºयांना मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सोयाबीनचे दर दिवसेंदिवस वाढतच असून, सोमवारी बाजार समित्यांत व्यापाºयांकडून सोयाबीनला ३६०० रुपयांहून अधिक दर शेतकºयांना मिळाला. वाढत्या दरामुळे सोयाबीनची आवकही मोठ्या प्रमाणात होत असून, जिल्ह्यात सोमवारी वाशिम वगळता पाच बाजार समित्या आणि उपबाजार मिळून ३० हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. त्यात कारंजा बाजार समितीतच ८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. शासनाने यंदा सोयाबीनला ३३९९ रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव जाहीर केले आहेत, तर यंदा बाजारात व्यापाºयांनी सुरुवातीपासूनच सोयाबीनची चांगल्या दराने खरेदी सुरू केली होती. यंदाचे सोयाबीन बाजारात येण्यास सुरुवात झाल्यानंतर बाजार समित्यांत व्यापाºयांकडून प्रति क्विंटल सरासरी ३१०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत होते. त्यानंतर सोयाबीनचे राष्ट्रीय बाजारातील दर आणि मागणी वाढू लागल्याने स्थानिक बाजारातून सोयाबीनची उचल मोठ्या प्रमाणात सुरू झाली. या तेजीचा फायदा घेण्यासाठी व्यापाºयांनी सोयाबीनच्या दरात वाढ केली. सोमवारी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर बाजार समितीत सोयाबीनला ३६१५ रुपये प्रति क्विंटल, तर कारंजा येथील बाजार समितीत जास्तीतजास्त ३६७० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळाले. शासनाकडून जाहीर हमीभावाच्या तुलनेत व्यापाºयांनी दिलेले भाव हे २०० रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मानोरा या बाजार समित्यांसह शेलूबाजार आणि अनसिंग येथील बाजारांतही सोयाबीनला ३५०० रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळाले. गेल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात तेजी आल्याने शेतकºयांनीही सोयाबीनच्या विक्रीवर जोर देण्यास सुरुवात केल्यामुळे बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढत आहे. एकट्या कारंजा बाजार समितीत सोमवारी ८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली, तर इतर बाजार समित्या आणि उपबाजार मिळून ३० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली होती.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिमKaranjaकारंजा