शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन आठ हजार पार, तूर व हरभऱ्याचे दर हमीपेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 11:29 IST

Agricuture sector News : गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये तूरीला ५४००; तर हरभऱ्या ३८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सध्या विक्री करण्यासाठी सोयाबीनचा दाणाही शिल्लक राहिलेला नाही, शेकडो क्विंटल तूर व चणा मात्र पडून आहे. असे असताना सोयाबीनचे प्रतिक्विंटल दर सध्या आठ ते दहा हजारांवर पोहोचले असून तूर आणि हरभऱ्याचे प्रतिक्विंटल दर मात्र हमीपेक्षाही कमी झाले आहेत. या अजब परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.जिल्ह्यात पूर्वी खरीप हंगामात प्रामुख्याने कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतले जायचे. त्यापाठोपाठ, तूर, मूग, उडीद, ज्वारी या पिकांचा पेरा केला जायचा. मात्र, गेल्या काही वर्षांत अन्य सर्व पिकांच्या तुलनेत सोयाबीनचाच सर्वाधिक पेरा होत आहे. जून महिन्यात पेरणी केल्यानंतर साधारणत: सप्टेंबर महिन्यात उत्पादित सोयाबीन शेतकऱ्यांकडून बाजारपेठेत विक्रीसाठी नेले जाते. गतवर्षी सुरुवातीच्या काळात सोयाबीनला जास्तीत जास्त ३८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. त्यानंतर काहीच दिवसांत हे दर ४ ते ५ हजारांवर पोहोचले. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी घर व गोदामांमध्ये साठवून ठेवलेले सोयाबीन विकण्याची घाई केली. काही प्रमाणात शिल्लक असलेल्या सोयाबीनचा बियाणे म्हणून वापर करण्यात आला. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे विकण्याकरिता सोयाबीनच शिल्लक राहिलेले नाही. असे असताना सोयाबीनला सध्या ‘न भूतो न भविष्यती’, असा १० हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिकचा दर मिळत आहे.दुसरीकडे तूर आणि चना हा शेतमाल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून पडून असताना गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये तूरीला ५४००; तर हरभऱ्या ३८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. जो हमीदरापेक्षाही कमी असल्याने  माल विकावा किंवा नाही, या द्विधा मन:स्थितीत  जिल्ह्यातील शेतकरी सापडले आहेत. 

महिनाभरात १९ हजार क्विंटल सोयाबीन विक्रीवाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी सप्टेंबर महिन्यानंतर शेतकऱ्यांकडून दैनंदिन विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या सोयाबीनची विक्रमी आवक होते. साधारणत: नव्या वर्षातील फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून हे प्रमाण कमी होत जाते. दरम्यान, जुलै २०२१ मध्ये सोयाबीनच्या दराने उच्चांक गाठला. मात्र, अधिकांश शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक राहिले नाही. या महिन्यात वाशिमच्या बाजार समितीत सुमारे १९ हजार क्विंटल सोयाबीनची विक्री झाली. त्यातुलनेत २३ हजार ५४० क्विंटल तूर आणि १३ हजार ७६४ क्विंटल चणा विकला गेला.

गतवर्षी सोयाबीन हाती आल्यानंतर काहीच दिवसांत सोयाबीनचे दर पाच हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले होते. ते तुलनेने अधिक वाटल्याने सर्व सोयाबीन विक्री केले. आता तेच दर ८ ते १० हजार रुपयांवर पोहोचले असताना जवळ सोयाबीनचा दाणाही शिल्लक राहिलेला नाही.- राजेश कडू, शेतकरी, खानापूर

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीMarket committee washimबाजार समिती वाशिम