सोयाबिन सुडीला आग; लाखोंची हानी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 20:12 IST2017-10-05T20:12:22+5:302017-10-05T20:12:41+5:30

जऊळका रेल्वे (वाशिम): येथून जवळच असलेल्या खडकी मसला येथील शेतकरी दत्ता हरिभाऊ धनगर आणि नामदेव दौलत धनगर यांच्या शेतात रचून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुडीला ४ आॅक्टोबर रोजी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले. या घटनेत संबंधित शेतकºयांची लाखो रुपयांची हानी झाली आहे.

Soya bean fire; Lack of millions! | सोयाबिन सुडीला आग; लाखोंची हानी!

सोयाबिन सुडीला आग; लाखोंची हानी!

ठळक मुद्देखडकी मसला येथील घटनाशेतात रचून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुडीला अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले

लोकमत न्यूज नेटवर्क
जऊळका रेल्वे (वाशिम): येथून जवळच असलेल्या खडकी मसला येथील शेतकरी दत्ता हरिभाऊ धनगर आणि नामदेव दौलत धनगर यांच्या शेतात रचून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुडीला ४ आॅक्टोबर रोजी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले. या घटनेत संबंधित शेतकºयांची लाखो रुपयांची हानी झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मसला शेतशिवारातील गट क्रमांक १४८ मधील साडेपाच एकरातील अंदाजे ४५ क्विंटल सोयाबिन (किंमत १ लाख ३५ हजार), व गट क्रमांक १४४ मधील ३५ क्विंटल (किंमत १ लाख रुपये) सोयाबिन जळून खाक झाले. याबाबत जऊळका पोलिसांत दाखल फिर्यादींवरून अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Soya bean fire; Lack of millions!