वाशिम जिल्ह्यात सोयाबीन, कपाशीचा पेरा वाढणार
By Admin | Updated: June 27, 2014 01:45 IST2014-06-27T01:39:33+5:302014-06-27T01:45:24+5:30
पावसाला विलंब होत असल्यामुळे शेतकर्यांना पेरणीच्या नियोजनात बदल करावा लागणार

वाशिम जिल्ह्यात सोयाबीन, कपाशीचा पेरा वाढणार
वाशिम : पावसाला विलंब होत असल्यामुळे शेतकर्यांना पेरणीच्या नियोजनात बदल करावा लागणार आहे.तशा स्थितीत जिल्ह्यातील उडीद,मूग व ज्वारीच्या पिकाचे नियोजन केलेल्या शेतकर्यांना सोयाबीन किंवा कपाशीच्या पेरण्या कराव्या लागणार आहेत. परिणामी , जिल्ह्यात सोयाबीन व कपाशीचा पेरा यंदा वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
मागीलवर्षी ६ जूनला पावसाळयाला प्रारंभ झाला होता व १५ जूनपर्यंत बहुतांश पेरण्या झाल्या होत्या. यावर्षी २५ जून उलटून जाउनही नियमित पावसाळा सुरु झालेला नाही.परिणामी जिल्ह्यात बहुतांश पेरण्या बाकीच आहे.राज्यात जुलैच्या पहिल्या आठवडयात नियमित पावसाळा सुरु होण्याचा अंदाज हवामान विषयक विविध वेबसाईटनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात सन २0१४ च्या खरीप हंगामात जिल्हाप्रशासनाने ४ लाख २६ हजार ५९0 हेक्टर क्षेत्रात विविध पिकांच्या पेरण्या करण्याचे नियोजन केले आहे.त्यात सोयाबीन २ लाख १३ हजार ९९0 हेक्टर ,कपाशी ५६, हजार ३७0 हेक्टर, तूर ५२,७८0 हेक्टर,ज्वारी ३४,६४0हेक्टर, उडीद ३३,३३0 हेक्टर,मूग ३२,८६0 हेक्टर या प्रमुख पिकांसह तीळ ८७0 हेक्टर,बाजरी ७८0हेक्टर,ऊस २२0 हेक्टर,मका २१0हेक्टर,इतर कडधान्ये २00हेक्टर,इतर तृणधान्ये १00हेक्टर,इतर गळीत धान्ये १00 हेक्टर,तांदूळ १00हेक्टर,भुईमूग २0हेक्टर,सूर्यफुल २0 हेक्टर याप्रमाणे पिकांचा समावेश आहे.
सध्या जिल्ह्यात केवळ ४ टक्के एवढय़ा क्षेत्रात पेरण्या झालेल्या आहेत.परंतु, चांगल्या पावसा अभावी अद्यापही जिल्ह्याच्या बहुतांश क्षेत्रात पेरण्या होणे बाकी आहे.