निर्बंध शिथिल होताच नागरिकांची गर्दी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST2021-08-15T04:41:53+5:302021-08-15T04:41:53+5:30
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील हजारो नागरिकांना संसर्गाची बाधा झाली. त्यापैकी काही नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले. दरम्यानच्या काळात ...

निर्बंध शिथिल होताच नागरिकांची गर्दी वाढली
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील हजारो नागरिकांना संसर्गाची बाधा झाली. त्यापैकी काही नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले. दरम्यानच्या काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यानंतर कोरोना संसर्गाच्या आकडेवारीत काहीशी घट झाली. त्यामुळे १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता येताच नागरिकांनी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.कोरोना संबंधीचे नियमसुध्दा यावेळी पायदळी तुडविल्या जात आहे. त्यामुळे अशी स्थिती काही दिवस राहिल्यास कोरोनाची तिसरी लाट रोखणे अशक्य होणार आहे. कोरोनामुळे केंद्र तसेच राज्य शासन हतबल झाल्याचा अनुभव सव्वा वर्ष संपूर्ण देशवासीयांनी घेतला आहे. सव्वा वर्षात कोरोना संसर्गाच्या आलेल्या दोन लाटेत संपूर्ण देशाला धडा मिळाला; परंतु निर्बंध शिथिल होताच बहुतेकांना कोरोना संसर्गाच्या गांभिर्याचा विसर पडला. हा प्रकार भविष्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी पोषक ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनीसुद्धा कोरोनाचे नियम पाळून सहकार्य करणे आवश्यक आहे.
---------------
जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची गरज
वाशिम जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने शासन निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचा गैरफायदा आता नागरिक घेत आहेत. सार्वजनिक ठिकाणी नियंत्रणाबाहेर गर्दी उसळत असून, विविध व्यवसाय सुरू ठेवण्यास रात्री ८ वाजेपर्यंतचीच मुभा असताना रात्री १० वाजताच्या नंतरही अनेक दुकाने चौकाचौकात सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळते. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासह नियम उल्लंघनप्रकरणी कारवाईचा धडाका सुरू करण्याची गरज आहे.