सोनोग्राफी केंद्राची तपासणी
By Admin | Updated: January 6, 2015 00:41 IST2015-01-06T00:41:31+5:302015-01-06T00:41:31+5:30
वाशिम जिल्हा सामान्य रूग्णालयातील पथकाद्वारे सोनोग्राफी केंद्राची तपासणी मोहीम.
_ns.jpg)
सोनोग्राफी केंद्राची तपासणी
वाशिम : जिल्हा सामान्य रूग्णालयातील पथकाकडून सोनोग्राफी केंद्राची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर मोहीमेंतर्गंत आज ५ जानेवारी रोजी वाशिम येथील रेनॉल्डस मेमोरियल हॉस्पिटलमधील सोनोग्राफी केंद्राची तपासणी करण्यात आली.
मोहीमेंतर्गत तपासणी पथकाने रेनॉल्डस हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशिनची तपासणी केली असता तेथील सोनोग्राफी मशिन नादुरूस्त स्थितीत आढळून आली.
तपासणी पथकामध्ये नायब तहसीलदार मडके, डॉ. अलका मकासरे, डॉ. गोरूले, डॉ. राठोड, अँड. राधा नरोलीया यांचा समावेश होता. सदर मोहीम संपूर्ण जिल्हयात राबविण्यात येणार आहे.
वाशिम शहरातील तसेच जिल्हयातील सोनोग्राफी केंद्र तपासणीची मोहीम शासकीय पथकाच्यावतीने सुरू झाली आहे. पथकामध्ये तज्ञ मंडळीसह मान्यवरांचा समावेश असून यापुढेही मोहीम सुरू राहणार असल्याचे डॉ. व्ही.डी. क्षिरसागर यांनी स्पष्ट केले.