रायफल शूटिंग स्पर्धेत ‘सोनल’ची सोनेरी कामगिरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST2021-09-10T04:49:16+5:302021-09-10T04:49:16+5:30

वाशिम : नागपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र एअर गन ॲण्ड फायर आर्म १० मीटर एअर पिस्टोल स्पर्धेत वाशिम येथील ...

Sonal's golden performance in rifle shooting competition! | रायफल शूटिंग स्पर्धेत ‘सोनल’ची सोनेरी कामगिरी!

रायफल शूटिंग स्पर्धेत ‘सोनल’ची सोनेरी कामगिरी!

वाशिम : नागपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र एअर गन ॲण्ड फायर आर्म १० मीटर एअर पिस्टोल स्पर्धेत वाशिम येथील सोनल पुरुषोत्तम चव्हाण हिने राज्यातून प्रथम येत सुवर्ण पदक पटकाविले. सोनलच्या या सोनेरी कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रात वाशिमचे नाव राज्यात चमकले आहे.

अलीकडच्या काळात क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे खेळाडू विभाग, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांत यश मिळवीत आहेत. प्री-नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेत पिस्टोल शूटिंग या गटातून सोनल चव्हाण हिने प्रावीण्य मिळवून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला होता. आता नागपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र एअर गन ॲण्ड फायर आर्म १० मीटर एअर पिस्टोल स्पर्धेत सोनलने राज्यातून प्रथम येत सुवर्ण पदक पटकाविले आहे. सोनल ही वाशिम येथील महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ण्रुरूषोत्तम चव्हाण यांची कन्या आहे. सोनल हिच्या या यशाबद्दल विविध सामाजिक संघटना, संस्थांकडून तिचा सत्कार करण्यात येत आहे.

Web Title: Sonal's golden performance in rifle shooting competition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.