शिक्षकाचा मुलगा बनला डीवायएसपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:45 IST2021-09-06T04:45:38+5:302021-09-06T04:45:38+5:30

अभंग जोशी यांनी अभियांत्रिकीच्या शाखेतून बी.टेकची पदवी प्राप्त केली असून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होत ते डीवायएसपी या पदावर कार्यरत ...

The son of a teacher became a DYSP | शिक्षकाचा मुलगा बनला डीवायएसपी

शिक्षकाचा मुलगा बनला डीवायएसपी

अभंग जोशी यांनी अभियांत्रिकीच्या शाखेतून बी.टेकची पदवी प्राप्त केली असून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होत ते डीवायएसपी या पदावर कार्यरत आहेत .

भारत- तिबेट सीमा पोलीस दल हे भारतातील एक महत्त्वाचे सीमा सुरक्षा दल आहे ज्याची स्थापना २४ ऑक्टोबर १९६२ मध्ये करण्यात आली . २०१९ मध्ये एकूण ५३ असिस्टंट कमांडंटची निवड या दलामध्ये करण्यात आली. ८ ऑगस्टला अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मसुरी येथे दलाचा दीक्षांत समारंभ पार पडला. या दीक्षांत समारंभ सोहळ्य़ात सर्वोत्तम कामगिरी, सर्वोत्तम इन्डोअर प्रशिक्षण कामगिरी व गृहमंत्री प्रदान ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ हे तिन्ही पुरस्कार महाराष्ट्राचे अभंग जोशी यांनी मिळवले. आयटीबीपीच्या इतिहासात प्रथमच एकाच अधिकाऱ्यास तीन महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत तसेच त्यांनी परेडच्या संचालकपदाची धुरा सांभाळली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आणि आयटीबीपीचे महासंचालक एस. एस. देसवाल यांच्या हस्ते अभंग यास ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ प्रदान करण्यात आली. अभंग जोशी हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील आहेत. त्यांचे आईवडील दोघेही शिक्षक आहेत.

००००००००००००००००

रिसाेड येथे सत्कार

पोलीस दला डीवायएसपी पदापर्यंत झेप घेणाऱ्या अभंग जोशी याचा रिसोड येथे सत्कार करण्यात आला. यावेळी राकाँचे ज्येष्ठ नेते बाबाराव खडसे पाटील, युवानेते अमितभाऊ खडसे, ॲडव्होकेट संतोष जाधव, विनोद पाटील खडसे, रमेश पाटील सदार, दिलीप जोशी, सुधीर सरकटे, नितीन सरकटे, साहेबराव सरकटे आदिंची उपस्थिती होती.

Web Title: The son of a teacher became a DYSP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.