शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

ग्रामीण भागातील समस्यांचे ‘आॅन दि स्पॉट’ निराकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 6:32 PM

वाशिम : वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदार संघाचे आमदार लखन मलिक यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी थेट मतदारांच्या गावात जावून जनता दरबार घेणे सुरू केले आहे. याअंतर्गत जनतेच्या समस्या ‘आॅन दि स्पॉट’ सोडविण्यात येत असल्याचे उकळीपेन (ता. वाशिम) येथे सोमवारी दिसून आले. 

ठळक मुद्देजनतेच्या समस्या ‘आॅन दि स्पॉट’ सोडविण्यात येत असल्याचे उकळीपेन (ता. वाशिम) येथे सोमवारी दिसून आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी व जनता थेट आमनेसामने आल्यामुळे जनतेच्या समस्या तातडीने निकाली निघत आहेत.

 वाशिम : वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदार संघाचे आमदार लखन मलिक यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी थेट मतदारांच्या गावात जावून जनता दरबार घेणे सुरू केले आहे. याअंतर्गत जनतेच्या समस्या ‘आॅन दि स्पॉट’ सोडविण्यात येत असल्याचे उकळीपेन (ता. वाशिम) येथे सोमवारी दिसून आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी व जनता थेट आमनेसामने आल्यामुळे जनतेच्या समस्या तातडीने निकाली निघत आहेत. उकळीपेन येथील जनता दरबार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार लखन मलिक होते. बाजार समितीचे मुख्य प्रशासक बंडू पाटील महाले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, धनंजय हेंद्रे, मोहन चौधरी, सरपंच खोडके, उपसरपंच गोवर्धन चव्हाण, शरद चव्हाण, तहसीलदार बळवंत अरखराव, गटविकास अधिकारी वाघ, महावितरणचे अधिक्षक अभियंता बेथारीया, उपअभियंता चव्हाण, कृषी अधिकारी देवगीरकर, अनसिंगचे ठाणेदार जाधव, गजानन हेंबाडे, उल्हास राठोड, बालासाहेब चव्हाण, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी घरकुल योजना, विहीर योजना, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना, अन्नसुरक्षा योजना, रेशनकार्ड समस्या, विद्युत पोल, स्मशान भूमी व्यवस्था, शौचालय बांधकाम, पिण्याच्या पाण्याची समस्या, शेतकरी खरीप पीक कर्ज प्रकरणे, रस्ते, पुल व शिक्षण विभागाच्या एकुण १०० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांचे तडकाफडकी निराकरण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार मलिक म्हणाले की, ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमातंर्गत जनता दरबाराच्या माध्यमातून सार्वजनिक समस्या सोडविण्यासाठी आपण सर्वंकष प्रयत्न करणार आहोत. उकळीपेन येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता सुरदुसे, संतोष चव्हाण, नारायण खोडके,  प्रल्हाद अंभोरे, मोहन गांजरे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. जनता दरबाराचे फलीत!उकळीपेन येथे अनेक वर्षांपासून लाईनमन व तलाठी नव्हता. जनता दरबारामुळे अधिकारीवर्गाने तातडीने जनता दरबारातच तलाठी व लाईनमनची नियुक्ती केली. हे जनता दरबाराचे फलीतच म्हणावे लागेल. प्रथमच अशाप्रकारे जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या निकाली काढण्यात आल्या. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवLakhan Malikलखन मलिक