माती परीक्षण, खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST2021-03-17T04:42:43+5:302021-03-17T04:42:43+5:30

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रविंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार्डी टकमोर येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच ...

Soil testing, kharif pre-season farmer training | माती परीक्षण, खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण

माती परीक्षण, खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रविंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार्डी टकमोर येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच गजानन सखाराम कांबळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील संतोष चौधरी, कुक्कूट पालन व्यावसायिकउत्तम कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गावचे तांत्रिक समन्वयक एस. के. देशमुख यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून शेतकऱ्यांनी पुढील खरीप हंगामाच्या दृष्टीने माती परीक्षण नवीन वाण बीज प्रक्रिया याबाबतचे तांत्रिक ज्ञान अवगत करण्याचे आवाहन केले. कृषी विद्या शाखेचे प्रमुख टी. एस. देशमुख यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने मातीचा नमुना घेण्याची पद्धत व त्यापासून होणारे फायदे याविषयी तांत्रिक विवेचन केले, तसेच पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे व बियाणे वापरताना उगवण शक्ती तपासावी याविषयीचा संदेश दिला. कार्यक्रमात उपस्थिताना शेती संबंधित अद्ययावत कृषी तंत्रज्ञान, तसेच हवामान अंदाज माहितीसाठी मोबाईल द्वारे व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुपचा गावपातळीवर वापर करावा, याबद्दल देखील माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन चौधरी, तर आभार प्रदर्शन दिनेश चौधरी यांनी केले.

Web Title: Soil testing, kharif pre-season farmer training