सोहमनाथ महाराज समाधी सोहळा रद्द; साधेपणाने धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST2021-04-25T04:39:53+5:302021-04-25T04:39:53+5:30
अरविंद राठोड आसोला खुर्द : आसोला खुर्द येथील सोहमनाथ महाराज समाधी सोहळा यात्रोत्सव ६७ वर्षांनंतर सलग दुसऱ्या वर्षी खंडित ...

सोहमनाथ महाराज समाधी सोहळा रद्द; साधेपणाने धार्मिक कार्यक्रम
अरविंद राठोड
आसोला खुर्द : आसोला खुर्द येथील सोहमनाथ महाराज समाधी सोहळा यात्रोत्सव ६७ वर्षांनंतर सलग दुसऱ्या वर्षी खंडित झाला. कोरोनामुळे भाविकांनीदेखील घरीच राहणे पसंत केले असून, साधेपणाने शनिवारी धार्मिक कार्यक्रम आटोपण्यात आले.
संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने प्रशासनाच्यावतीने सर्व कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना केल्या होत्या. या आवाहनाला प्रतिसाद देत सोहमनाथ महाराज संस्थानच्यावतीने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम आटोपला. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. रामनवमीच्या नंतर सर्वांत मोठी यात्रा आसोला खुर्द येथे भरते; पण सलग दोन वर्षांपासून कोरोना विषाणूमुळे रद्द करण्यात येत आहे. सोहमनाथ महाराज संस्थानचे पुजारी पुरुषोत्तम गिरी महाराज यांनी दोन पावले गाढे ओढून व मंदिरात पूजाअर्चा करून सोहळा आटोपला. दरवर्षी या महोत्सवाकरिता दोन कि.मी. परिसर हा भाविकांनी गजबजलेला असतो. रात्रभर लोकांनी गर्दी अन् गाडे ओढून गावाला प्रदक्षिणा व पुरणपोळीचा रोट येथे ६७ वर्षीपासून अविरत सुरू आहे. या दोन वर्षांपासून खंड पडला. या सोहळ्याकरिता पंचक्रोशीतील भाविक मोठ्या भक्तिभावाने येथे येत असल्याने परिसरातील झाडे हे भाविकांचे आश्रयस्थान बनले असते. भाविक बारा दिवसांपासून उपवास व गावातील नागरिक आपल्या घराची स्वच्छता करतात. या यात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे पुरणपोळीचा नवस हजारो भाविक फेडून महाप्रसादाचे वाटप करतात. तसेच यानिमित्त विविध ठिकाणाहून व्यावसायिक येऊन आपली दुकाने मोठ्या प्रमाणात धाटतात. परंतु, दोन वर्षांपासून पुजारी पुरुषोत्तम गिरी महाराज यांनी पूजा करून कार्यक्रम आटोपता घेण्यात आले. काठी मिरवणूक साध्या पद्धतीने बरशीच्या दुसऱ्या दिवशी गावातून मोठ्या गाजावाजासह काठी मिरवणूक निघते; पण दोन वर्षांपासून जल्लोषात न करता साध्या पद्धतीने पूजाअर्चा करण्यात आली. आपल्या घरून सोहमनाथ महाराजांचे दर्शन घेऊन त्याच्या पुरणपोळीचा नैवेध फेडला हे विशेष. पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त होता.
यावेळी गावातील भक्त मंडळी म. भागवत वाचक नरेश महाराज जवळगावकर, बाबुसिंग नाईक, भीमराव राठोड, दिनेश गावंडे, रवी हांडे, कैलास हांडे, बिबिषण जाधव व गोपाल भोयर हे उपस्थित होते.