इच्छुकांचे सोशल मिडीयावर ‘गुणगाण’

By Admin | Updated: September 26, 2014 00:37 IST2014-09-26T00:37:23+5:302014-09-26T00:37:23+5:30

उमेदवारी जाहीर होण्याआधिच इच्छुकांचा प्रचार : फेसबुक व व्हॉटस अँपचा सर्वाधिक वापर

Social Media wants to 'Multiplication' | इच्छुकांचे सोशल मिडीयावर ‘गुणगाण’

इच्छुकांचे सोशल मिडीयावर ‘गुणगाण’

वाशिम : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून, सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहे. प्रचाराचे हायटेक साधनांमुळे आपल्याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे सोशल मिडीया अंत्यत उपयुक्त व सर्वांनापर्यंत पोहचणारे साधन ठरत आहे. अनेकांनी स्वताची उमेदवारी जाहीर होण्याआधिच सोशल मिडीयावर पेज तयार करून स्वत:चेच गुणगाण सुरू केल्याचे चित्र आहे.
सध्या प्रमुख पक्षांची उमेदवारी कुणाला मिळते, याची सर्वांना उत्सुकता असून, सर्वच जण पक्षांच्या उमेदवारीच्या यादीची वाट पाहत आहेत. त्यामुळे व्हॉट्स अँप , फेसबुक व अन्य प्रसारमाध्यमांवर विविध पक्षांसह इच्छूक उमेदवार निवडणुकीच्या तोंडावर आपले गुणगाण गाताना दिसून येत आहेत. काही इच्छूक उमेदवारांनी तर विरोधकांचे अनेक मुद्दे सुध्दा आपल्या पेजवर टाकले व लाईक मिळविल्याचे चित्र आहे. नेता कसा असावा, युवकांनी काय केले पाहिजे, बहुमतातील सरकारमुळे काय होवू शकते यासह अनेक बाबी यानिमित्ताने इच्छूक उमेदवार सोशल मिडीयाव्दारे जनतेपर्यंत पोहचवत आहेत. काही जणांनी तर चक्क आपण काय केले, काय करीत आहे याचे संपूर्ण माहिती सोशल मिडीयावर टाकली. तसेच काही जणांकडून याचा गैरवापरही होत आहे.
गत पंधरा दिवसांपूर्वी शिवसेनेची राज्यातील काही मतदारसंघातील उमेदवारांची यादी व्हॉट्स अँपवर झळकली होती. ही यादी पाहिल्यानंतर राजकीय वतरुळात बरीच चर्चा झाली. अनेकांनी ही यादी व्हॉट्स अँपवर मित्रांना पाठविली. काही इच्छुक उमेदवारांकडेही ती गेली. त्यांनी याची चौकशी केली असता, शिवसेनेने अद्याप कोणतीही यादी अधिकृतपणे जाहीर केली नसून, ही यादी केवळ खोडसाळपणा असल्याचे सांगण्यात आले होते.
सद्यास्थितील राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांसह अनेकांचे सोशल मिडीयावर भर दिसत असून यावर ते स्वताचेच गुणगाणही टाकत असल्याचे चित्र आहे. तसेच इच्छूक उमेदवाराकडून आपण केलेले कार्याचा लेखा जोखा टाकून मतदारांना तुम्ही कशा उमेदवाराला निवडून दयाल असे प्रश्न सुध्दा केल्या जात आहे.

Web Title: Social Media wants to 'Multiplication'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.