सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन!
By Admin | Updated: April 8, 2017 22:14 IST2017-04-08T22:14:27+5:302017-04-08T22:14:27+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन शनिवार, ८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याहस्ते करण्यात आले.

सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन!
वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन शनिवार, ८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार, सरस्वती समाज कार्य महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक उध्दव जमधाडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, संविधानाच्या माध्यमातून देशात न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुत्व स्थापित करण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचाराच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी जिल्ह्यात ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची संबंधित सर्व विभागांनी चोख अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.