अंगणवाडी सेविकांनी राबविले सामाजिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST2021-09-25T04:45:07+5:302021-09-25T04:45:07+5:30

काजळेश्वर उपाध्ये : येथून जवळच असलेल्या औरंगपूर येथे अंगणवाडी सेविकांनी विशेष सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला. ...

Social activities carried out by Anganwadi workers | अंगणवाडी सेविकांनी राबविले सामाजिक उपक्रम

अंगणवाडी सेविकांनी राबविले सामाजिक उपक्रम

काजळेश्वर उपाध्ये : येथून जवळच असलेल्या औरंगपूर येथे अंगणवाडी सेविकांनी विशेष सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला. यासाठी त्यांना श्री बालगणेश मंडळानेही सहकार्य केले. याबद्दल धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल ठाकरे यांनी त्यांचा सन्मानही केला. शासनाच्या ई-पीक पाहणी उपक्रमासाठी अंगणवाडी सेविका दीपाली भगत व बालगणेश मंडळाने सहकार्य करताना गावातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ७/१२ वर १०० टक्के नोंदी पूर्ण झाल्या. शिवाय लसीकरणाची जनजागृती केल्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण ९० टक्के झाले असून उर्वरित लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत पोषण आहाराबाबतही त्यांनी जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत. यासाठी धनजचे ठाणेदार अनिल ठाकरे, एपीआय राठोड, शिवाजी ठक्कर, शामल ठाकूर आरोग्य विभागाचे डॉ. काळे व आरोग्य कर्मचारी, महिला तलाठी सानप, सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते आदींचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

Web Title: Social activities carried out by Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.