शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

मराठवाड्यातून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 11:41 AM

Smuggling of sand in Washim वझर घाट (ता.जिंतूर, जि.परभणी) आणि मंठा (जि.जालना) येथून वाहणाऱ्या नदीघाटावरून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा गेल्या ५ वर्षांपासून लिलाव झालेला नाही. चोरीची रेती अवैधरीत्या वाशिममध्ये आणली जात आहे. ‘मॅनेज’ झाल्याने कुणावरही कारवाई होत नसल्याचे उघड होत आहे. 

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : मराठवाड्यातील हिंगोली-परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील पूर्णा नदीनजूक वसलेला वझर घाट (ता.जिंतूर, जि.परभणी) आणि मंठा (जि.जालना) येथून वाहणाऱ्या नदीघाटावरून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक सुरू आहे. ही रेती वाशिममध्ये आणली जात असून अनेक रेती तस्कर या ठिकाणी सक्रिय झाले आहेत. असे असताना महसूल विभागाचे कर्मचारी रेती तस्करांसोबत अर्थपूर्ण व्यवहारांमधून ‘मॅनेज’ झाल्याने कुणावरही कारवाई होत नसल्याचे उघड होत आहे. पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याने वाशिम जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा गेल्या ५ वर्षांपासून लिलाव झालेला नाही. असे असतानाही बांधकामांसाठी लागणारी रेती ठरावीक पैसे मोजल्यास सहज उपलब्ध होत आहे. यासंबंधी अधिक माहिती घेतली असता, मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहत असलेल्या नदीवरून आणि मंठा (जि.जालना) येथील नदीघाटावरून हिंगोली जिल्ह्यातील कापडशिंगी, सेनगाव, गोरेगाव, कोळंबी यामार्गे वाशिम शहरातील हिंगोली रोडवर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राजवळून चोरीची रेती अवैधरीत्या वाशिममध्ये आणली जात आहे. सद्यस्थितीत वझरजवळून वाहणाऱ्या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक असल्याने तेथून होणारी रेतीची वाहतूक बंद आहे; मात्र मंठा येथून हिंगोली-जालना या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील बन या गावात स्टॉप घेऊन तेथून हिंगोली व वाशिम या दोन जिल्ह्यांना रेती सप्लाय केली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. याबाबत महसूल विभागाला पुरेशी कल्पना आहे; परंतु अर्थपूर्ण सेटलमेंटमुळे कुणावरही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.

चोरट्या मार्गाने होत असलेल्या रेती वाहतुकीसंदर्भात सखोल चौकशी करण्यात येईल. तहसीलदारांशी समन्वय साधून तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला जाईल. याउपरही हा गंभीर प्रकार थांबला नाही; तर संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला जाईल.- प्रशांत जाधव, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वाशिम

रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. याऊपरही हा प्रश्न सुटणे कठीण झाले आहे. नागरिकांनीदेखिल सजग राहून माहिती द्यायला हवी. कारवाईची गती यापुढे निश्चितपणे वाढविली जाईल. तशा सुचना तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना दिल्या जातील.- विजय साळवेतहसीलदार, वाशिम

टॅग्स :washimवाशिमsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग