शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात केवळ ७ प्रकल्पांतील गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 14:33 IST

गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत केवळ ७ प्रकल्पांतील गाळ उपशाचे काम पूर्ण होऊ शकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांची जमीन सुपिक व्हावी आणि प्रकल्पाची साठवण क्षमताही वाढावी, या उद्देशाने जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळ उपसा करण्यासाठी ७३ प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते; परंतु यातील केवळ ७ प्रकल्पांतील गाळ उपशाचे काम पूर्ण होऊ शकले आहे. त्यामुळे या अभियानाचा यंदा म्हणवा तेवढा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.जिल्ह्यात यंदा गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत सहा तालुक्यातील मिळून ७९ प्रकल्पांतील गाळ उपसा करण्याबाबतचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी स्तरावर सादर करण्यात आले होते. त्यापैकी ७३ प्रस्तावांना उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. शेतकºयांना या प्रकल्पातील गाळ शेतात टाकण्यासाठी मोफत दिला जाणार होता, तर गाळ उपशामुळे प्रकल्पांची खोली वाढून जलसाठ्यात मोठी वाढ होणार होती. तथापि, मंजूर करण्यात आलेल्या ७३ प्रस्तावांपैकी केवळ ५० प्रकल्पांतील गाळ उपशाच्या कामाला सुरुवात होऊ शकली आणि त्यातील केवळ ७ प्रकल्पांतील गाळाचा उपसा होऊ शकला. यात मालेगाव तालुक्यातील एका प्रकल्पातून ३० हजार घनमीटर, वाशिम तालुक्यातील ५ प्रकल्पांतून ७० हजार ८०८ घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. त्याशिवाय मंगरुळपीर तालुक्यातील एका प्रकल्पातील गाळ उपशाचे कामही पूर्ण करण्यात आले. दरम्यान मानोरा तालुक्यातील तीन प्रकल्पांत काम सुरू करण्यात आल्यानंतर या प्रकल्पांतून ३३ हजार ५० घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. प्रकल्पातील ओलाव्यामुळे सुरुवातीच्या काळात हे अभियान राबविण्यात अडचणी निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सद्यस्थितीत वाशिम तालुक्यातील एक, मंगरुळपीर तालुक्यातील दोन आणि मानोरा तालुक्यातील तीन प्रकल्पातील गाळ उपशाचे काम प्रगतीपथावर आहे. २३ प्रकल्पांची कामे सुरुच झाली नाही !जिल्ह्यात उपविभागीय स्तरावरून ७३ प्रकल्पांतील गाळ उपशाच्या कामांना मंजुरी मिळाली. त्यापैकी ५० प्रकल्पांत कामाला सुरुवात तरी, केवळ ७ प्रकल्पांतील गाळाचा उपसा झाला, ६ प्रकल्पांतील गाळाचा उपसा सुरू आहे, तर १८ प्रकल्पांचे काम बंद करण्यात आले आहे. उर्वरित २३ प्रकल्पांत गाळ उपशाचे काम सुरू होऊ शकले नाही. आता पावसाळ्याला सुरूवात झाली असून, प्रकल्पात पुन्हा पाण्याचा संचय सुरू झाला आहे किंवा गाळात ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रगतीपथावर असलेली कामेही प्रलंबित राहून केलेला खर्च व्यर्थ ठरणार असल्याचे दिसत आहे.गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानात मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांपैकी ५० हून अधिक प्रकल्पांची कामे सुरु करण्यात आली. त्यापैकी ७ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून, इतर १४ प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. या कामांसाठी शेतकºयांचा प्रतिसाद न लाभल्याने कामे पूर्ण करण्यात अडथळा आला.-लक्ष्मण मापारीउपकार्यकारी अभियंताजलसंधारण विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमDamधरण