वाहनाला लटकवलेल्या बॅगमधून साठ हजार रुपये लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:44 IST2021-09-18T04:44:22+5:302021-09-18T04:44:22+5:30
शहरात किरकोळ चोऱ्यांसह बॅगमधून पैसे लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यात १६ सष्टेंबर रोजी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास अशीच ...

वाहनाला लटकवलेल्या बॅगमधून साठ हजार रुपये लंपास
शहरात किरकोळ चोऱ्यांसह बॅगमधून पैसे लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यात १६ सष्टेंबर रोजी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास अशीच एक घटना घडली. रवींद कुऱ्हेकर (४९) हे १६ सष्टेंबर रोजी अडत भागीदार शकील शेख यांनी शेतकऱ्यांना देण्यासाठी ५० हजार रक्कम बँकेतून काढून आणून दिली. रवींद्र कुऱ्हेकर यांनी त्यांच्याकडील १० हजार व शकील यांनी दिलेली ५० हजारांची रक्कम असे एकूण ६० हजार रुपये बॅगेत टाकून त्यांच्या एमएच ३७ - २२४० क्रमांकाच्या दुचाकीला ती बॅग लटकविली व ते नेहरू चौकातील गुप्ता यांच्या किराणा दुकानात गेले. तेथून साहित्य खरेदी करून आल्यानंतर त्यांना दुचाकीला लटकवलेली बॅग दिसून आली नाही. या बॅगमध्ये रोख ६० हजार रुपयांसह आधार व पॅन कार्ड, वाहन परवाना, दुकानाची चाबी, आदी साहित्यही होते. बॅग न आढळल्याने त्यांनी शहर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली. त्यावरून शहर पोलिसांनी १७ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला.