शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

वाशिम जिल्ह्यात सहाव्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:17 PM

 जिल्ह्यात सकाळपासूनच सर्वदूर पाऊस असून, हिसई गावाजवळ बाभळीचे झाड पडल्यामुळे मंगरूळपीर-शेलुबाजार मार्गावरील वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला.

ठळक मुद्दे१६ आॅगस्टच्या सायंकाळपासून कमी-अधिक प्रमाणात असलेल्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम आहे. कारंजा व मानोरा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले.शहरांमधील नाल्यांची साफसफाई व्यवस्थित झाली नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १६ आॅगस्टच्या सायंकाळपासून कमी-अधिक प्रमाणात असलेल्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम आहे.  जिल्ह्यात सकाळपासूनच सर्वदूर पाऊस असून, हिसई गावाजवळ बाभळीचे झाड पडल्यामुळे मंगरूळपीर-शेलुबाजार मार्गावरील वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला. दरम्यान, गत २४ तासांत २१ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४०.३६ मीमी पाऊस झाला. गत सहा दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. १६ आॅगस्ट रोजी कारंजा व मानोरा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. मानोरा तालुक्यात शुक्रवार, १७ आॅगस्टपासून सर्वेक्षणाला सुरूवातही झाली होती. शनिवार, रविवारी पावसाने थोडी उसंत घेतल्यानंतर सोमवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. मंगळवारी सकाळपासूनच पाऊस ठाण मांडून असल्याने सर्वेक्षणाचे कामही ठप्प पडले आहे. २० व २१ आॅगस्टच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. शेतीची कामे सहाव्या दिवशीही ठप्प असल्याचे दिसून येते. शहरांमधील नाल्यांची साफसफाई व्यवस्थित झाली नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मंगरुळपीर ते शेलुबाजार या महामार्गावरील हिसई गावाजवळ बाभळीचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला.

सरासरी ४० मीमी पावसाची नोंद..!गत २४ तासांत २१ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४०.३६ मीमी पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस वाशिम तालुक्यात ५५.४६ मीमी झाला. त्याखालोखाल मालेगाव तालुक्यात ५०.५० मीमी, रिसोड तालुक्यात ४१.४८ मीमी, कारंजा तालुक्यात ४०.५० मीमी, मंगरूळपीर तालुक्यात २८.५७ मीमी आणि मानोरा तालुक्यात २५.६७ मीमी पाऊस झाला.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसmonsoon 2018मान्सून 2018