सहाव्या दिवशी तिन्ही मतदारसंघात ४५ नामांकन दाखल
By Admin | Updated: September 26, 2014 23:34 IST2014-09-26T23:34:33+5:302014-09-26T23:34:33+5:30
वाशिम जिल्ह्यातत २५ उमेदवारांनी दाखल केलेत ४५ नामांकन अर्ज.

सहाव्या दिवशी तिन्ही मतदारसंघात ४५ नामांकन दाखल
वाशिम : आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी २६ सप्टेंबरला नामांकन दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी ४५ नामांकन दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघात १५ उमेदवारांनी २४ नामांकन दाखल केले. वाशिम विधानसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी ६ उमेदवारांनी ११ नामांकन तर रिसोड मतदार संधात एकूण ४ उमेदवारांनी १0 नामांकन दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी तिन्ही मतदारसंघातून १0६ उमेदवार अर्जांंचे वितरण झाले असुन यापैकी केवळ दोन नामांकन दाखल झाले होते.