पोळा सणाचा पोलिस बंदोबस्त सहा गावांनी नाकारला

By Admin | Updated: August 25, 2014 01:55 IST2014-08-25T01:46:23+5:302014-08-25T01:55:34+5:30

रिसोड पोलिस स्टेशन क्षेत्रातील ६५ गावांपैकी सहा गावांनी पोळा या सणासाठी पोलिस बंदोबस्त नाकारला

Six Villages of Pola Sanra rejected by the police | पोळा सणाचा पोलिस बंदोबस्त सहा गावांनी नाकारला

पोळा सणाचा पोलिस बंदोबस्त सहा गावांनी नाकारला

वाशिम जिल्ह्यातील प्रकार
विवेकानंद ठाकरे / वाशिम
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत रिसोड पोलिस स्टेशन क्षेत्रातील ६५ गावांपैकी सहा गावांनी पोळा या सणासाठी पोलिस बंदोबस्त नाकारला, तर १३ गावांनी बंदोबस्तासाठी पोलिसांची मागणी केली आहे.
शेतकर्‍यांचा महत्त्वपूर्ण सण असलेल्या पोळय़ाला गावामध्ये शांतता नांदावी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने संवेदनशील गावामध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येते. राज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सन २00७ पासून सुरू झाली. या धर्तीवर तंटामुक्ती अध्यक्ष पोलिस पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने गावामध्ये शांततामय वातावरण निर्माण करून पोलिस बंदोबस्त नाकारण्यासाठी पुढाकार घेतला जातो; परंतु अद्यापही तंटामुक्त गाव मोहिमेला पूर्णत: यश प्राप्त झाले नाही. केवळ आसेगाव पेन, वरुडतोफा, कोयाळी, करंजी गरड, व्याड, बाळखेड या ६ गावांतील नागरिकांनी पोलिस बंदोबस्त नाकारण्याचे पत्र पोलिस स्टेशनला सादर केले आहे. पोलिस बंदोबस्तासाठी करडा, देऊळगाव बंडा, बिबखेडा, खडकीसदार, घोटा, पळसखेडा, वाडी वाकद, कवठा, मोरगाव, कंकरवाडी, लेहणी या गावांनी मागणी केली. बहुतांश १५ लहान गावांमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत नाही. यामध्ये गणेशपूर, नांदळवाडी, पेडगाव, गौढाळा, किनखेडा, कन्हेरी, मांगवाडी, नागझरी, उकीरखेड आदींचा समावेश आहे.

Web Title: Six Villages of Pola Sanra rejected by the police