मेडशी येथे सहा पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST2021-03-21T04:40:53+5:302021-03-21T04:40:53+5:30
............................... शिरपूर येथे जनजागृती वाशिम : शिरपूर येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी पुन्हा तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह ...

मेडशी येथे सहा पॉझिटिव्ह
...............................
शिरपूर येथे जनजागृती
वाशिम : शिरपूर येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी पुन्हा तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, नागरिकांनी काळजी घेण्याबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात आली.
...........
जऊळका येथे वाहन तपासणी
वाशिम : जऊळका रेल्वे (ता. मालेगाव) येथे शनिवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने महामार्गावर उभे राहून वाहनांची कसून तपासणी केली. यावेळी अनेकांना आर्थिक दंडदेखील करण्यात आला.
.............
किन्हीराजा येथे वीजपुरवठा सुरळीत
वाशिम : किन्हीराजा येथील शेतकऱ्यांकडे वीज देयकांची थकबाकी वाढतच आहे. यामुळे महावितरणने काही दिवसांपूर्वी कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित केला होता. शेतकऱ्यांनी देयक अदा केल्यानंतर तो सुरळीत करण्यात आला.
............
हॉटेल व्यावसायिक सापडले अडचणीत
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जेवणासाठी हॉटेलमध्ये बसण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. पार्सल सुविधा उपलब्ध आहे; मात्र ग्राहक त्यास तयार नसल्याने बहुतांश हॉटेल व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने प्रभावी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
..................
दंडाच्या धास्तीने बंद होताहेत दुकाने
वाशिम : कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. त्यानंतर दुकान सुरू असल्यास दंड केला जात आहे. या धास्तीने सर्व दुकाने वेळेत बंद होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
.................
करवसुलीवर होणार परिणाम
वाशिम : नगर परिषद, ग्रामपंचायतींचा बहुतांश कारभार दरवर्षी गोळा होणाºया करामधूनच चालतो; मात्र कोरोना संकटामुळे सर्वसामान्य कुटुंब अडचणीत सापडले असून त्याचा करवसुलीवर परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे.
..........................
२५६८ विद्यार्थी देणार परीक्षा
वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी वाशिम शहरातील सात परीक्षा उपकेंद्रांवर होत आहे. त्यासाठी २५६८ परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष बंदोबस्त तैनात केला आहे.
....................
नैसर्गिक संकटाचा आंब्याला फटका
वाशिम : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ओढवलेल्या नैसर्गिक संकटाचा आंब्याला जबर फटका बसला आहे. यामुळे यंदा पुन्हा गावरान आंबा मिळणे दुरापास्त होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.