२४ दिवसात शिरपूर येथे सहा रुग्ण डेंग्यूसदृश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST2021-08-26T04:43:53+5:302021-08-26T04:43:53+5:30
शिरपूर येथे ३ आगस्टपासून डेंग्यूसदृश सहा रुग्ण निष्पन्न झाल्याची माहिती आरोग्यवर्धनी केंद्रातून प्राप्त झाली आहे. यापैकी काही रुग्णांवर वाशिम, ...

२४ दिवसात शिरपूर येथे सहा रुग्ण डेंग्यूसदृश
शिरपूर येथे ३ आगस्टपासून डेंग्यूसदृश सहा रुग्ण निष्पन्न झाल्याची माहिती आरोग्यवर्धनी केंद्रातून प्राप्त झाली आहे. यापैकी काही रुग्णांवर वाशिम, तर काही रुग्णांवर अकोला येथे उपचार करण्यात आले. आरोग्य विभागाकडून गावात घरोघरी पाणी साठवण असलेल्या हौद, टाकीमध्ये टेमीफास्ट द्रावण मिसळण्यात येत आहे. तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐश्वर्या भालेराव व आरोग्य सहाय्यक बी. ए. गायकवाड यांच्या मार्गदर्शनात आशा सेविका घराघरातील पाणी साठवणूक करण्यात येणाऱ्या सिमेंट हौद, टाकी, माठ यामध्ये टेमिफास्ट द्रावण मिळण्यात येत आहे. तसेच आरोग्य कर्मचारी रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींचे रक्ताचे नमुने घेत आहेत. डेंग्यूचे रुग्ण वाढू नयेत, म्हणून गावांमध्ये नियमित स्वच्छता व धूर फवारणी करणे आवश्यक आहे. मात्र, धूर फवारणीसाठी आरोग्य वर्धनी केंद्रात आवश्यक ती औषधेच उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे.
००००
नागरिकांची चिंता वाढली
वातावरणातील बदलामुळे अगोदरच सर्दी, खोकला, ताप या आजारांमुळे बहुतांश लोक त्रस्त झाले आहेत. त्यातच डेंग्यूसारख्या आजाराने नागरिकांची चिंता वाढली आहे. डेंग्यूसदृश आजाराचे सहा रुग्ण निष्पन्न होणे, हे शिरपूरसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या गावाला अधिक धोकादायक ठरू शकते.