आणखी सहा जणांचा मृत्यू; ४९६ कोरोना पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:43 IST2021-05-07T04:43:27+5:302021-05-07T04:43:27+5:30

वाशिम : जिल्ह्यात आणखी सहा जणांचा मृत्यू तर ४९८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ६ मे रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण ...

Six more died; 496 corona positive! | आणखी सहा जणांचा मृत्यू; ४९६ कोरोना पॉझिटिव्ह !

आणखी सहा जणांचा मृत्यू; ४९६ कोरोना पॉझिटिव्ह !

वाशिम : जिल्ह्यात आणखी सहा जणांचा मृत्यू तर ४९८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ६ मे रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३०५१७ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. गुरूवारी प्राप्त अहवालानुसार आणखी सहा जणांचा मृत्यू झाला तसेच ४९६ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम तालुक्यात सर्वाधिक २२८, मालेगाव तालुक्यातील ७१, रिसोड तालुक्यातील ६४, मंगरूळपीर तालुक्यातील ४७, कारंजा तालुक्यातील ३८ आणि मानोरा तालुक्यात ११ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ३७ बाधिताची नोंद झाली असून ४९८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, सकाळच्या वेळी बाजारपेठेत गर्दी करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने गुरूवारी केले..

.........

एकूण पॉझिटिव्ह ३०५१७

ऍक्टिव्ह ४२५१

डिस्चार्ज २५९४१

मृत्यू ३२४

Web Title: Six more died; 496 corona positive!