रिसोड येथे सहा लाखांची चोरी
By Admin | Updated: December 9, 2014 00:56 IST2014-12-09T00:56:11+5:302014-12-09T00:56:11+5:30
घर फोडून सोन्याच्या दागिन्यासह सहा लाखांचा लंपास.

रिसोड येथे सहा लाखांची चोरी
रिसोड (वाशिम): मुलीच्या विवाह सोहळय़ासाठी गेलेल्या कुटुंबीयाचे घर फोडून सोन्याच्या दागिन्यासह सहा लाखांचा माल लंपास केल्याची घटना ८ डिसेंबरच्या उत्तररात्रीच्या दरम्यान गुरुवार बाजारस्थित घरामध्ये घडली आहे.
फिर्यादी शिवचंद्र बगडिया मुलीच्या लग्नासाठी अमरावती गेले असता घरातील दरवाजे तोडून ४ लाख ७९ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व १ लाख ३0 हजार रुपये नगदी असा ६ लाख ९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे.
कपाटामधील ६0 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या किंमत १ लाख ५0 हजार, सात सोन्याच्या अंगठय़ा ४0 ग्रॅम किंमत १ लाख रुपये, २ नगर सोन्याच्या कानातील रिंग २0 ग्रॅम किंमत ५0 हजार, २0 ग्रॅम सोन्याची पोत किंमत ५0 हजार, सोन्याचे छोटे-मोठे दागिने २0 ग्रॅम किंमत ५ हजार २५ हजार, २५ हजार किमतीचे ८00 ग्रॅम चांदीचे शिक्के व चांदीचे ताट, ग्लास, चमचे असे १५00 ग्रॅम वजन असलेले भांडे किंमत ५४ हजार असा एकूण ६ लाख ९ हजार रुपयांचा माल लंपास केला आहे. घटनेचा तपास लावण्याच्या दृष्टीने श्वानपथक बोलाविण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला.