सहा आरोग्य केंद्रांना मिळाली नवीन रुग्णवाहिका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:29 IST2021-06-03T04:29:03+5:302021-06-03T04:29:03+5:30

ग्रामीण भागात रुग्णवाहिका उपलब्ध करण्यावर भर देण्यात येत आहे. काही आरोग्य केंद्रांना सुसज्ज स्थितीत रुग्णवाहिका नसल्याने गैरसोय निर्माण होते. ...

Six health centers get new ambulances! | सहा आरोग्य केंद्रांना मिळाली नवीन रुग्णवाहिका !

सहा आरोग्य केंद्रांना मिळाली नवीन रुग्णवाहिका !

ग्रामीण भागात रुग्णवाहिका उपलब्ध करण्यावर भर देण्यात येत आहे. काही आरोग्य केंद्रांना सुसज्ज स्थितीत रुग्णवाहिका नसल्याने गैरसोय निर्माण होते. ही गैरसोय टाळण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शाम गाभणे, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून आरोग्य केंद्रांसाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. रिसोड तालुक्यातील कवठा व मोप, कारंजा तालुक्यातील मनभा व उंबर्डाबाजार, मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा आणि वाशिम तालुक्यातील वारला या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या. एका रुग्णवाहिकेची किंमत १६ ते १७ लाखांच्या घरात आहे. रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शाम गाभणे, सभापती चक्रधर गोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कऱ्हे यांची उपस्थिती होती.

Web Title: Six health centers get new ambulances!