वाशिम शहरात सहा कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST2021-02-05T09:28:24+5:302021-02-05T09:28:24+5:30
०००० रिठद येथे पुन्हा एक कोरोना पाॅझिटिव्ह रिठद : रिसोड तालुक्यातील रिठद येथील एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल २ ...

वाशिम शहरात सहा कोरोनाबाधित
००००
रिठद येथे पुन्हा एक कोरोना पाॅझिटिव्ह
रिठद : रिसोड तालुक्यातील रिठद येथील एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल २ फेब्रुवारी रोजी पाॅझिटिव्ह आल्याने, आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी केली. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
०००
रेतीअभावी घरकूल बांधकामे प्रभावित
केनवड : शासनाच्या विविध योजनेंतर्गत केनवड परिसरात सन २०२०-२१ मध्ये जवळपास ८० जणांना घरकूल मंजूर झालेले आहे, परंतु जिल्ह्यात रेती उपलब्ध नसल्याने आणि महागडी रेती परवडणारी नसल्याने घरकूल बांधकामे प्रभावित होत आहेत.
००००
शेतकऱ्यांना कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन
पोहरादेवी : गहू व हरभरा पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे कृषी विभागाच्या चमूने १ फेब्रुवारी रोजी पोहरादेवी परिसरात शेतकऱ्यांना कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या सल्ल्याने किटकनाशक फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले.
०००००
तपासणीनंतरच विद्यार्थींना शाळा प्रवेश
धनज बु. : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तपासणी करूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात असल्याचे चित्र धनज परिसरातील जिल्हा परिषद, तसेच खासगी शाळांमध्ये गत पाच दिवसांत पाहावयास मिळाले.
०००
शेतकऱ्याला नुकसानभरपाईची प्रतीक्षा
इंझाेरी : इंझोरी शिवारात नंदकिशोर तोतला या शेतकऱ्याच्या दहा एकर शेतातील संपूर्ण तुरीचे पीक रानडुकरांनी २० दिवसांपूर्वी जमीनदोस्त केले होते. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप भरपाई मिळाली नाही.