वाशिम तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींची स्थिती जैसे-थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST2021-02-05T09:25:32+5:302021-02-05T09:25:32+5:30
वाशिम तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण मंगळवारी तहसील कार्यालयात काढण्यात आले. त्यात अनुसूचित जातीकरिता २०, अनुसूचित जमातीकरिता ०३, नामाप्रकरिता ...

वाशिम तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींची स्थिती जैसे-थे
वाशिम तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण मंगळवारी तहसील कार्यालयात काढण्यात आले. त्यात अनुसूचित जातीकरिता २०, अनुसूचित जमातीकरिता ०३, नामाप्रकरिता २३, तर सर्व साधारण प्रवर्गासाठी ३८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित झाले. त्यात १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीसाठी पूर्वी नामाप्रसाठी गोंडेगाव, मोहजा रोड, येथील सरपंचपदाचे आरक्षण पूर्वी नामाप्रसाठी जाहीर झाले होते. त्यातील गोंडेगाव आणि मोहजा रोड या ग्रामपंचायती वगळल्या जाऊन त्या ठिकाणी एकांबा, चिखली या ग्रामपंचायतींचे आरक्षण नामाप्रसाठी जाहीर झाले. त्यामुळे या ग्रामपंचायतीमधील सरपंचपदासाठी आरक्षण मोर्चे बांधणी करणाऱ्यांचा मोठा हिरमोड झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील धानोरा बु., पार्डी, एकबुर्जी, राजगाव, सायखेडा, सावळी, (जांभरूण नावजी, जांभरूण भिते, जांभरूण धर्माजी), खंडाळा खु., सुकळी, वाघोली बु., केकतउमरा, देवठाणा बु., तांदळी बु., भोयता, काटा, पिंपळगाव, वारा जहॉ., कोंडाळा झामरे व अनसिंग शिरपुटी, इलखी, हिवरा, रोहिला, वाई, या ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी, तर सुपखेला, सुराळा, उकळीपेन या ग्रामपंचायतींचे सरपंचपद पूर्वी जाहीर आरक्षणाप्रमाणेच अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे.