शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियेसाठी एकच डॉक्टर; रुग्णांना तारीख पे तारीख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 19:41 IST

वाशिम - पोटाच्या विकारासह अन्य प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने रुग्णांना ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देवाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयरुग्णालयात एकच डॉक्टर उपलब्ध 

संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - पोटाच्या विकारासह अन्य प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने रुग्णांना ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गोरगरिब कुटूंबातील रुग्णांना मोफत स्वरूपात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. १०० खाटांवरून या दवाखान्यात २०० खाटांची सुविधा उपलब्ध झाली. मात्र, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची वाणवा असल्याने रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यात व्यत्यय निर्माण होत असल्याचे दिसून येते. जिल्हा सामान्य रुग्णालयात एम.एस. (सर्जन) म्हणून डॉ. बडे हे एकमेव डॉक्टर सेवा देत आहेत.  याच डॉक्टरांकडे मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काही दिवस जिल्हा सामान्य रुग्णालयात तर काही दिवस मालेगाव ग्रामीण रुग्णालयात सेवा द्यावी लागते. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रूग्णांना एक ते दीड महिन्यानंतरची तारीख दिली जात आहे. दिलेल्या तारखेला शस्त्रक्रिया होईलच याची कोणतीही खात्री नाही. जुलै महिन्यात तपासणी केलेल्या एका रूग्णाला २१ आॅगस्टला बोलाविण्यात आले होते. नेमके या  दरम्यान डॉ. बडे यांची ड्यूटी मालेगाव ग्रामीण रुग्णालयात लावण्यात आली. त्यानंतर आठ दिवसांनी या असे रुग्णाला सांगण्यात आले. सदर रुग्ण व नातेवाईक २८ आॅगस्ट रोजी आले असता, ११ सप्टेंबरची तारीख देण्यात आली. यासंदर्भात तत्कालिन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.बी. पटेल यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. जनार्दन जांभरूणकर यांना भेटण्यास सांगितले. डॉ. जांभरूणकर यांनी ३१ आॅगस्टला या, असे रुग्ण व नातेवाईकांना सांगितल्यानंतर ३१ आॅगस्टला रुग्ण व नातेवाईक आले. तथापि, या दिवशीदेखील शस्त्रक्रिया झाली नाही. डॉक्टरांची रिक्त पदे असल्याने हा प्रश्न निर्माण होत असल्याचे डॉ. जांभरूणकर यांनी सांगितले. आता या रूग्णाला ११ सप्टेंबर रोजी बोलाविण्यात आले आहे. असाच अनुभव शस्त्रक्रियेसाठी येणाºया अन्य रुग्णांना येत आहे.