शिक्षकांच्या बदलीसाठी स्वाक्षरी मोहीम
By Admin | Updated: April 24, 2015 02:01 IST2015-04-24T02:01:11+5:302015-04-24T02:01:11+5:30
वाशिम जिल्ह्यात २३ एप्रिलपर्यंत २00 शिक्षकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदविला.

शिक्षकांच्या बदलीसाठी स्वाक्षरी मोहीम
वाशिम : आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षकांनी २0 एप्रिलपासून स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. वाशिम जिल्ह्यात २३ एप्रिलपर्यंत २00 शिक्षकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदविला आहे. सध्या असलेल्या शासन निर्णयामुळे अनेक आंतरजिल्हा बदली शिक्षक बदलीपासून वंचित आहेत. शिक्षक सहकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या औरंगाबाद येथील बैठकीत स्वाक्षरी मोहिमेची दिशा ठरली आणि त्यानुसार सदर मोहीम सुरू करण्यात आली. राज्य रोस्टर एक करणे, आपसी बदली हेड टु हेड, पती-पत्नी एकत्रीकरण विनाअट, विनाविलंब आदी विषयांच्या पूर्ततेसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात संघटनेचे प्रतिनिधी तसेच सचिव हनुमंत खुने, विजयकुमार लिंबोरे, युवराज चव्हाण, किशोर पवार, विनोद कांबळे, नीलेश देशमुख आदींच्या नेतृत्वात मोहीम सुरू आहे.