मालेगावातील सिद्धीविनायक मंदिर
By Admin | Updated: September 5, 2014 23:59 IST2014-09-05T23:39:02+5:302014-09-05T23:59:08+5:30
मालेगावातील सिद्धीविनायक मंदिरात संगमरवरी दगडाची गणपतीची विलोभनीय मुर्ती.

मालेगावातील सिद्धीविनायक मंदिर
मालेगाव : शहरातील शिवचौकाजवळचे एकमेव गणपती मंदिर असून मंदिरात सिध्दीविनायकाची मुर्ती स्थापित आहे. संगमरवरी दगडाची गणपतीची आकर्षक मुर्ती असून ती मुर्ती साडेतीन फुट उंचीची आहे. त्यासाठी नंदकिशोर बोडखेंनी श्रध्देतून या मुर्तीची स्थापना केली आहे. दरवर्षी मोठया प्रमाणात येथे भाविक दर्शनासाठी येतात. संकष्ट चतुर्थी व अंगारक चतुर्थीला मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त होते. त्यावेळी महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते. गणपती महोत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमात किर्तन भजन घेतल्या जातात.
पुर्वी मुखी या मंदिराला आकर्षक मोठा सभामंडप आहे. २00९ ला या मंदिराची स्थापन करण्यात आली असून त्याला आता ५ वष्रे पुर्ण झाले .