भाविकांची मनोकामना सिध्द करणारा वाशिमचा सिध्दी विनायक
By Admin | Updated: September 6, 2014 00:00 IST2014-09-05T23:41:57+5:302014-09-06T00:00:14+5:30
वाशिम येथे तिनशे वर्षापूर्वीचे सिध्दी विनायक मंदिर.

भाविकांची मनोकामना सिध्द करणारा वाशिमचा सिध्दी विनायक
वाशिम : इतिहास कालीन प्राचिन वारसा लाभलेल्या वत्सगुल्म वाशिम नगरीमध्ये आदी पुरातन काळापासून म्हणजेच सुमारे तिनशे वर्षापूर्वीचे सिध्दी विनायक मंदिर शहरातील नागरिकांच्या मनोकामना सिध्द करणारा सिध्दी विनायक म्हणून सुप्रसिध्द आहे.
शहरातील गणेश पेठ परिसरातील असलेल्या सिध्द विनायक मंदिरात उजव्या सोंडेची तीन फुट उंचीची प्राचिन व मोहक अशी सुंदर मुर्ती आहे. १९३0 मध्ये या मंदिराचा जिर्णोध्दार करुन सभागृह बांधण्यात आले आहे. सिध्दविनायक मंदिराचे दत्त गणेश उत्सव, संकष्ट चतुर्थी, अंगारिका चतुर्थी, गणेश जयंती, यासह शाश्वत अभिषेक सहस्त्रावर्तन अभिषेक, धार्मिक ग्रंथाचे पारायण, समाज प्रबोधनपर कीर्तन, प्रवचने, इत्यादी धार्मिक कार्यक्रम विधीपुर्वक व पारंपारिक पध्दतीने राबविली जातात. सध्या संस्थानचे अध्यक्ष म्हणून सखारामपंत खपली, सचिव म्हणून डॉ.संजय जोशी, माजी अध्यक्ष मधूकरराव मोकाटे, सदस्य मुकेश बसमतकर, गणेश जोशी, संदिप जोशी, श्याम जोशी आदी गणेशभक्त मंदिराची व्यवस्था पाहत आहे. त्याचप्रमाणे शहरातील पद्मतिर्थ परिसरात भालचंद महाराज देशपांडे पार्डीकर यांनी गणेश मंदिराची स्थापना केली. त्यामुळे या मंदिराला पद्मतिर्थ गणेश मंदिर म्हणतात.
** बाकलीवाल कॉलनी गणपती मंदिर
शहरातील लाखाळा परिसरात बाकलीवाल कॉलनीतील रहिवासींनी १९९२ मध्ये हे गणपती मंदिर बांधले. मंदिराचा घुमट कलात्मक व मोठा आहे. शहरातील गणेश पेठ परिसरातच करुणेश्वर मंदिराच्या आवारात प्राचिन गणेश मंदिर आहे. या मंदिरातील गणपती मुर्ती संकल्प पूर्ती गणपती म्हणून सर्वत्र प्रख्यात आहे. दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते.
** संगमरवरी काला पाषाण गणपती
वाशिममधील गुरुवार बाजारामध्ये २00२ मध्ये छोटेसे संगमरवरी गणेश मंदिर बांधण्यात आले. या मंदिरात काला पाषाण गणपती मुर्तीची स्थापना करण्यात आली. फुलोरा लावण्यात येणारे शहरातील एकमेव गणेश मंदिर आहे. वडाच्या वृक्षाखाली असलेल्या या मंदिरातील गणेशजी नवसाला पावणारा म्हणून भाविकांमध्ये ख्याती मिळवित आहे. नवस पूर्ण झाल्यानंतर या मंदिरामध्ये भाविक नारळाची माळ, चांदीची गणपती मुर्ती, चांदीच्या दुर्वा, चांदीचा मुकूट, छत्र मोठया ङ्म्रध्देने येथे अर्पण करतात. दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी या मंदिरातील गणपती मुर्ती साठी चेन्नई मद्रास येथून विशेष वस्त्र भक्तांकडून पाठविले जाते हे विशेष. अध्यक्ष धिरज बबनराव रत्नपारखी व सचिव पंडित आनंद विजयप्रकाश दायमा यांच्यासह अविनाश वानखेडे उज्वल शिवाल, अमोल राठी काही सदस्य मंदिराची व्यवस्था पाहत आहेत.
वाशिम शहराच्या उत्तर पुर्व भागामध्ये विनायक नगर परिसरात २00३ मध्ये विनायक मंदिराची स्थापना करण्यात आली. ४७ फुट उंचीच्या या मंदिरामध्ये कोरीव नक्षीकाम केलेले असून येथे गणपतीची पाषाणाची मुर्ती स्थापीत केली आहे. शहरातील डॉ.अशोक बंग, भीमराव गंगावणे, पंडित भैरुलाल महाराज, विवेक पाटणी व कुंदनकुमार गुप्ता यांनी हे मंदिर बांधले असल्याची इतिहासात नोंद आहे.