चिंचांबापेन गावचं पडल आजारी
By Admin | Updated: September 23, 2014 01:25 IST2014-09-23T01:19:00+5:302014-09-23T01:25:51+5:30
प्रत्येक घरात एक ना एक रूग्णाचा समावेश

चिंचांबापेन गावचं पडल आजारी
औरंगाबाद : कुण्या गावाचं आलं पाखरू, बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची, अप्सरा आली यासारख्या बहारदार लावण्यांच्या तालावर महिला वर्ग थिरकला. निमित्त होते लोकमत सखी मंचतर्फे आयोजित सखी उत्सवांतर्गत अप्सरा आली या लावण्यांच्या कार्यक्रमाचे. लावणी कलाकारांच्या वेगवेगळ्या अदांवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा प्रतिसाद देत सखींनी कलाकारांचा उत्साह द्विगुणित केला.
यानिमित्ताने लावणी कलावंतांच्या अदाकारीने तरुणींबरोबरच वयोवृद्ध महिलांनाही थिरकण्यास भाग पाडले.
त्यानंतर ‘कुण्या गावाचं आलं पाखरू’ ही लावणी झाली. पाठोपाठ ‘बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची’ या लावणीचा धमाका झाला. त्यात कलावंतांसोबत नृत्य करण्याचा मोह सखींना आवरता आला नाही. प्रेक्षकांनी व्यासपीठाचा ताबा घेतला आणि कलावंतांसोबत नृत्याचा आनंद लुटला. त्यानंतर अर्चना सावंत यांनी ‘गंमत जंमत’ या चित्रपटातील ‘चोरीचा मामला मामा ही थांबला’ हे धमाल गीत सादर झाले. ‘यो यो पाहुणा मुंबईचा मेव्हणा’ , त्यानंतर ‘टाईमपास’ चित्रपटातील गीत ‘ही पोरी साजूक तुपातली’, नंतर ‘कामावर जायला उशीर व्हायला’ या बहारदार लावणीचे सादरीकरण करण्यात आले, तसेच या लावण्यांच्या सादरीकरणादरम्यान प्रेक्षकांच्या गटात नृत्य सादर करून महिलांना सहभागी करून घेतले. वयोवृद्ध महिलांसोबत नृत्य कलावंतांनी पावल्या खेळल्या. ‘कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली’ या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी सखी मंचच्या अध्यक्षा रेखा राठी यांच्यासह पद्मजा मांजरमकर, गीता अग्रवाल, मनीषा सोनी आदींची उपस्थिती होती.
लोकमत सखी मंचतर्फे आयोजित अप्सरा आली या कार्यक्रमात गाणी, नृत्यासह उत्कृष्ट सूत्रसंचालनाच्या जोडीला शेरोशायरीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाची सुरुवात ही तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता या गाण्याने झाली.
४यानिमित्ताने राधा- कृष्णाच्या रासलीलेतील छोटे छोटे किस्से सांगून महिलांची मने वळविली. याच कार्यक्रमात बैठकीची लावणी, खडी लावणी आणि तारुण्याची लावणी असे लावण्यांचे वेगवेगळे प्रकारदेखील सादर करण्यात आले.
यातच ‘या रावजी तुम्ही बसा भावजी’ या लावणीला वन्स मोअर घेत कार्यक्रम पुढे सौंदर्यांच्या लावणीजवळ येऊन ठेपला.
४त्यात सौंदर्यांची लावणी म्हणजेच नाकी डोळी छान, रंग गोरापान... ही लावणी सादर होताच प्रेक्षकांमधील तरुणींनी जागेवरच ठेका धरला. तरुणींचा गट जागेवरूनच लावण्यांचा आस्वाद लुटत थिरकत
होता.