वत्सगुल्म नगरीत श्री रामाचा जयघोष
By Admin | Updated: April 16, 2016 01:39 IST2016-04-16T01:39:43+5:302016-04-16T01:39:43+5:30
कडक उन्हातही रामभक्तीचा उत्साह.

वत्सगुल्म नगरीत श्री रामाचा जयघोष
वाशिम: 'जय श्रीराम'च्या गजरात व उल्हासमय वातावरणात वत्सगुल्म नगरीत राम नवमीच्या पर्वावर श्रीरामाचा जयघोष घुमला. १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता कडक उन्हात शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या युवकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता.
स्थानिक ङ्म्रीराम मंदिर येथे दुपारी १२ वाजता ङ्म्रीराम जन्मोत्सव पार पडल्यानंतर ङ्म्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष कोठारी, जगदीश व्यास, संतोष लक्रस, आमदार लखन मलीक, नगराध्यक्ष लता उलेमाले, माजी नगराध्यक्ष अशोक हेडा, न.प.सदस्य राजू भांदुर्गे, नगरसेवक नागोराव ठेंगडे, नगरसेविका अर्चन मगर, नगरसेवक बादशाह धामणे, नगरसेवक संतोष शिंदे, माजी नगरसेवक मिठुलाल शर्मा, सामाजिक कार्यकर्ते अनिल केंदळे, अनिल कुळकर्णी, नितीन उलेमाले, माणिक देशमुख, रामा इंगळे, कपिल सारडा, हरीश ओंदीया, गजानन भांदुर्गे, आदींच्या हस्ते श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या धातुंच्या मूर्तीचे पूजन व महाआरती करण्यात आली. जय श्रीरामच्या जयघोषात दुपारी २ वाजता श्रीराम मंदिराच्या प्रांगणातून वाजत गाजत शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.