‘श्रीं’च्या आरतीसाठी जमणारे भाविक देताहेत कपड्यांचे  दान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:37 IST2017-09-04T01:37:29+5:302017-09-04T01:37:53+5:30

मंगरुळपीर: स्पर्धेच्या या युगात प्रत्येकाची  जीवनशैलीदेखील बदलली आहे. दुसरीकडे मात्र समाजा तील एक घटक आजही वंचित, उपेक्षितांचे जीणे जगत  आहे. या ठरावीक घटकाला अंग झाकण्यासाठी क पडेदेखील मिळत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन ‘यंग  सिटिझन टीम’ या सेवाभावी सामाजिक संघटनेने पुढाकार  घेत मंगरूळपीर येथील गणेश मंडळांसमोर चक्क ‘कापड  बँक’ सुरू केली आहे. त्या ठिकाणी ‘श्रीं’च्या आरतीसाठी  जमणारे भाविक स्वयंस्फूर्तीने जुने; पण वापरायोग्य कपडे  आणून ठेवत असल्याचे प्रेरणादायी चित्र निर्माण झाले  आहे.

'Shree's donation of clothes donated by devotees for the Arti! | ‘श्रीं’च्या आरतीसाठी जमणारे भाविक देताहेत कपड्यांचे  दान!

‘श्रीं’च्या आरतीसाठी जमणारे भाविक देताहेत कपड्यांचे  दान!

ठळक मुद्देमंगरूळपीरात उपक्रम‘यंग सिटिझन टीम’ने गोरगरिबांसाठी सुरू केली ‘कापड  बँक’

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: स्पर्धेच्या या युगात प्रत्येकाची  जीवनशैलीदेखील बदलली आहे. दुसरीकडे मात्र समाजा तील एक घटक आजही वंचित, उपेक्षितांचे जीणे जगत  आहे. या ठरावीक घटकाला अंग झाकण्यासाठी क पडेदेखील मिळत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन ‘यंग  सिटिझन टीम’ या सेवाभावी सामाजिक संघटनेने पुढाकार  घेत मंगरूळपीर येथील गणेश मंडळांसमोर चक्क ‘कापड  बँक’ सुरू केली आहे. त्या ठिकाणी ‘श्रीं’च्या आरतीसाठी  जमणारे भाविक स्वयंस्फूर्तीने जुने; पण वापरायोग्य कपडे  आणून ठेवत असल्याचे प्रेरणादायी चित्र निर्माण झाले  आहे.
येत्या काही दिवसात हिवाळा  सुरू होत आहे. या दिवसात  बेघर तथा रस्त्यांच्या कडेला झोपडे-खोपडे करून वास्तव्य  करणार्‍या गोरगरिबांचे कडाक्याच्या थंडीने अतोनात हाल  होतात. ही बाब लक्षात घेता अशा गोरगरिबांना कपड्यांची  मदत व्हावी, या हेतूने जुने, पण सुस्थितीत असलेले, वा परायोग्य कपडे गणेश मंडळांसमोर सुरू केलेल्या कापड  बँकेत आणून जमा करावे. ते कपडे शहर परिसरातील गरजू  लोकांपर्यंत पोहचविले जातील, असे गणेश मंडळांनी  ठरविले आहे. 
या सामाजिक उपक्रमात मंगरुळपीर येथील ओम गणेश  मंडळ, वीर भगतसिंग गणेश मंडळ, महाराष्ट्र गणेश मंडळ,  शिवरत्न गणेश मंडळ  व लष्कर-ए-शिवबा गणेश मंडळाने  सहभाग घेतला आहे. ‘यंग सिटीझन टीम’च्या पुढाकारात  असे उपक्रम अमरावती, आर्णी आणि मानोरा येथेदेखील  राबविणे सुरू आहे. 
या उपक्रमासंदर्भात अधिक माहिती देताना ‘यंग सिटीझन  टीम’चे अध्यक्ष सुचित देशमुख, उपाध्यक्ष अतुल खोपडे  यांनी सांगितले, की समाजातील वंचितांना अंगभर कपडे  घालायला मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या  उपक्रमास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 
नागरिकांनी हिवाळा सुरू होण्याआधी जुने कपडे स्वच्छ  करून संबंधित गणेश मंडळांकडे जमा करावेत, असे  आवाहनही ‘यंग सिटिझन टीम’ने केले आहे. उपक्रमाच्या  यशस्वीतेसाठी करण मुंधरे, मयूर पाटील, अनुप इंगळे, दी पक खांबलकर, पुरुषोत्तम शर्मा, सोमनाथ परंडे, निखिल  राठोड, शुभम बोरकर, संघदीप खिराडे, समराजीत रघुवंशी  यांच्यासह प्रगती भाकरे, कामाक्षी कातरे पुढाकार घेत  आहेत.

Web Title: 'Shree's donation of clothes donated by devotees for the Arti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.