शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

वाशिममध्ये २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान गड, किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 19:49 IST

वाशिम : पाहतानाही धडकी भरावी असे सरळसोट कडे, ऊन, वारा, पाऊस याचे सातत्याने आक्रमण झेलून आजही पराक्रमाची साक्ष देत उभे असलेले बुरुज, गडाच्या समृध्दीची झलक देणा-या वास्तू, भव्य तटबंदी, देखण्या शिलाकलेचे दर्शन घडविणारे दरवाजे अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील १०८ हून अधिक गड, किल्ल्यांच्या एकाहून एक सरस छायाचित्रांचे प्रदर्शन वाशिममध्ये २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. ही माहिती हिंदवी परिवाराचे जिल्हाप्रमुख दिलीप मेसरे यांनी दिली.

ठळक मुद्दे हिंदवी परिवाराचा उपक्रम: शिवरायांच्या अतुल्य पराक्रमाचे दर्शन

लोकमत न्यूजनेटवर्क वाशिम : पाहतानाही धडकी भरावी असे सरळसोट कडे, ऊन, वारा, पाऊस याचे सातत्याने आक्रमण झेलून आजही पराक्रमाची साक्ष देत उभे असलेले बुरुज, गडाच्या समृध्दीची झलक देणा-या वास्तू, भव्य तटबंदी, देखण्या शिलाकलेचे दर्शन घडविणारे दरवाजे अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील १०८ हून अधिक गड, किल्ल्यांच्या एकाहून एक सरस छायाचित्रांचे प्रदर्शन वाशिममध्ये २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. ही माहिती हिंदवी परिवाराचे जिल्हाप्रमुख दिलीप मेसरे यांनी दिली.हिंदवी परिवार, शिवछत्रपती बहूउद्देशिय युवा संस्था व राजे वाकाटक वाचनालयाच्या संयुक्त आयोजनातून येत्या २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान दररोज सकाळी १्र० ते ०७  या वेळेत स्थानिक वाकाटक वाचनालयात ही छायाचित्र प्रदर्शनी शाळकरी मुलामुलींपासून ते मोठ्यांपर्यत विनामुल्य स्वरुपात भरविण्यात येणार आहे. या माध्यमातून आजच्या पिढीला शिवरायांच्या अतुल्य पराक्रमाचे दर्शन घडणार आहे. प्रदर्शनीच्या अनुषंगाने दुर्मिळ नाणे प्रदर्शनीही ठेवण्यात आली आहे. संगमनेरचे दुर्गमित्र व दुर्गभ्रमंतीकार श्रीकांत कासट यांनी गेली ३५ वर्षे महाराष्ट्रातील द-याखो-यात फिरुन शिवरायांच्या स्वराज्यातील गडकोटांना आपल्या कॅमे-यात टिपले आहे. त्यातील शिवरायांच्या पराक्रमाशी, त्यांच्या जीवनाशी निगडीत निवडक गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे हे प्रदर्शन आहे. परकीय आक्रमकांच्या सततच्या हल्ल्याने होरपळून निघालेल्या रयतेला छत्रपती देणारा किल्ले शिवनेरी, त्याचा इतिहास, भुगोल, स्वराज्याला आकार देण्यात अग्रेसर असलेला तोरणा, स्वराज्याची पहिली राजधानी ठरलेला आणि स्वराज्यावर आलेल्या अनेक जीवघेण्या संकटाचा मुक साक्षीदार असलेला राजगड, शंभुराजांच्या जन्माबरोबरच, मिर्झा राजाशी झालेल्या तहाची आठवण करुन देणारा पुरंदर, अफजलखानाच्या बलाढ्य संकटावेळी राजांच्या पाठी भक्कमपणे उभा राहणारा प्रतापगड, बाजीप्रभू देशपांडेंचा पराक्रम उजळवणारा पन्हाळा आणि त्यापुढे विशालगडाच्या मार्गावरील भयाण वाटणारी घोडखिंड अर्थात पावनखिंड, शिवरायांच्या अचूक नियोजनातून सरनौबत प्रतापराव गुर्जर आणि पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी हल्ला करुन अशक्य ते शक्य करुन दाखविलेले किल्ले साल्हेर व मुल्हेर, गरुडालाही भिती वाटावी असा कडा सर करुन विजयश्री मिळविणार्‍या तानाजींचा सिंहगड, अशा वेगवेगळ्या गड-किल्ल्यांची वेगवेगळ्या ऋतूत काढलेली छायाचित्रे सोबतच नगर जिल्हयातील हरिश्चंद्रगड, रतनगढ, पट्टा किल्ला, अलंग-कुलंग व मदन गडाची श्रृंखला या प्रदर्शनीचे विशेष आकर्षण राहणार आहे. 

टॅग्स :washimवाशिम