दुकानाला आग; लाखोंची हानी

By Admin | Updated: June 11, 2017 02:11 IST2017-06-11T02:11:33+5:302017-06-11T02:11:33+5:30

मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील घटना.

Shops fire; Loss of millions | दुकानाला आग; लाखोंची हानी

दुकानाला आग; लाखोंची हानी

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर: तालुक्यातील शेलूबाजार येथील बसस्टँड चौकातील नवीन किशोर गाडगे यांच्या आप्पास्वामी किराणा दुकानाला ९ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.
नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजतादरम्यान दुकान बंद करून नवीन गाडगे हे घरी गेले होते. रात्रीच्या ११ वाजताच्या दरम्यान दुकानातून धूर निघत असल्याने आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या आल्यानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत आगीत दोन्ही मजल्यावरील किराणा माल पूर्णपणे जळून खाक झाला. लाखो रुपयांची हानी झाली असून, आगीचे कारण अद्याप समजले नाही.

Web Title: Shops fire; Loss of millions