दुकानदारावर चाकूहल्ला
By Admin | Updated: January 23, 2016 02:04 IST2016-01-23T02:04:53+5:302016-01-23T02:04:53+5:30
दुकानदारावर चाकूहल्ला; मंगरुळपीर पोलिसांनी आरोपीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.

दुकानदारावर चाकूहल्ला
मंगरुळपीर (जि. वाशिम): येथील बिरबलनाथ मंदिरजवळ किराणा दुकानदार शंकरलाल बाहेती यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जखमी केल्याप्रकरणी मंगरुळपीर पोलिसांनी आरोपी फिरोज खानसह दोघांविरुद्ध २२ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला. शंकरलाल बाहेती यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले आहे, की २१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास शंकरलाल बाहेती किराणा दुकानात हिशेब करीत असताना आरोपी फिरोज खान याने शेंगदाणे मागितले. त्यावेळी फिर्यादी शंकरलाल बाहेती यांनी त्याला शेंगदाणे नाही, असे म्हटले असता आरोपीने त्याच्याजवळील चाकूने फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर मारून जखमी केले. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी फिरोज खानसह आणखी एका विरोधात कलम ३२४, ३४ भांदविनुसार गुन्हा दाखल केला.