दुकानाला आग; हजारोचा माल भस्मसात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:18 IST2017-09-11T02:18:14+5:302017-09-11T02:18:28+5:30

मंगरूळपीर : शहरातील व्हिडिओ चौकातील महेंद्रकुमार  अमृतलाल किराणा दुकानाला शनिवारी सकाळी आग  लागल्याने त्यामध्ये मालाचे मोठय़ा प्रमाणावर साहित्य जळून  दुकान मालकाचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. 

Shop fire; Assassinate thousands of goods | दुकानाला आग; हजारोचा माल भस्मसात 

दुकानाला आग; हजारोचा माल भस्मसात 

ठळक मुद्देमंगरूळपीर येथील घटनाव्हिडिओ चौकातील किराणा दुकानाला आग

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : शहरातील व्हिडिओ चौकातील महेंद्रकुमार  अमृतलाल किराणा दुकानाला शनिवारी सकाळी आग  लागल्याने त्यामध्ये मालाचे मोठय़ा प्रमाणावर साहित्य जळून  दुकान मालकाचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. 
शहरातील व्हिडिओ चौकात भिमाणी यांचे महेंद्रकुमार अमृ तलाल नावाचे किराणा किराणा दुकान आहे. शनिवारी  सकाळच्या सुमारास या दुकानातून धूर निघत असल्याचे  शेजारचे व्यावसायिक राजू खिराडे यांना दिसले. त्यामुळे  राजू  खिराडे यांनी तत्काळ मंगरुळपीर नगर परिषदेच्या अग्निशमन  दलाला घटनास्थळी पाचारण केले. आग वाढत असल्याचे  पाहून जवळच्या सर्व दुकानदारांनी पाण्याचा मारा करुन  दुकानातील आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु  दुकानात  तेलजन्य पदार्थ व सायकलचे टायर असल्याने आग बर्‍याच  वेळपयर्ंत आटोक्यात आली नाही. दरम्यान, मंगरुळपीर नगर  परिषदेचे अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी पोहोचले  आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, भीमाणी  यांच्या दुकानातील आग विझविण्यासाठी परिसरातील  व्यावसायिक राजू खिराडे, सुनील मालपाणी, शंकर रघुवंशी,  सुनील भुतडा, गट्ट सुखाडिया तसेच मंगरुळपीर अग्निशमन  दलाचे काळे, धनंजय खंडेतोड, आनंद खिराडे, आनंदा  भडागे यांनी प्रयत्न केल्याने संभावित मोठा अनर्थ टळला. त थापि, दुकानातील विविध धान्य आणि इतर साहित्य  जळाल्याने दुकान मालकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले  आहे.

Web Title: Shop fire; Assassinate thousands of goods